Friday, March 29, 2024
Homeट्रेंडिंग'WAR' सिनेमाचा टीझर रिलीज एका दिवसात 25 दशलक्ष विव्स

‘WAR’ सिनेमाचा टीझर रिलीज एका दिवसात 25 दशलक्ष विव्स

हृतिक-टायगरच्या अ‍ॅक्शन पॅक चित्रपटाच्या ट्रेलरला अवघ्या एका दिवसात 25 दशलक्ष व्ह्यूज मिळाले

मुंबई: अभिनेता हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांचा WAR हा सिनेमा मागच्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. या सिनेमात टायगर आणि हृतिक एकमेकांना भिडताना दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा टीझर रिलीज झाला असून याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला असून याला प्रेक्षकांची वाहावा मिळत आहे.हृतिक-टायगरच्या अ‍ॅक्शन पॅक चित्रपटाच्या ट्रेलरला अवघ्या एका दिवसात 25 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत.यात टायगर आणि हृतिक यांच्या अ‍ॅक्शन सीन्सनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

टायगर श्रॉफ आणि हृतिक रोशन यांच्यामध्ये या सिनेमात गुरू शिष्याचं नातं दाखवण्यात आलं आहे. मात्र असं असतानाही टायगर हृतिकच्या विरोधात जातो आणि त्याच्यात सुरू होतं वॉर. त्याची ही कथा. हृतिक आणि टायगर दोघंही या ट्रेलरमध्ये जबरदस्त अ‍ॅक्शन अवतारात दिसत आहेत. याशिवाय या सिनेमात अभिनेत्री वाणी कपूरचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे मात्र ट्रेलरमध्ये तिच्या भूमिकेवरून अद्याप पडदा उठलेला नाही. टायगर श्रॉफ नेमका आपल्या गुरूच्या विरोधात का उभा राहतो आणि या वॉरचा शेवट काय याविषयीची उत्सुकता या ट्रेलरमुळे आता ताणली गेली आहे.

वाणी कपूरनं या सिनेमासाठी तिच्या फिटनेसवर विशेष मेहनत घेतली आहे. या सिनेमातील तिचा लुक रिलीज झाल्यावर त्याची सगळीकडेच खूप चर्चाही झाली होती. खासकरून या सिनेमातील तिचा बिकिनी लुक सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

गांधी जयंतीच्या मुहुर्तावर अर्थात 2 ऑक्टोबरला हा सिनेमा देशभरात प्रदर्शित होणार आहे. सिनेमात आंतरराष्ट्रीय दर्जाचे अ‍ॅक्शन सीन दाखवण्यात आले आहेत. वॉरचा ट्रेलर पाहताना स्टंट आणि अ‍ॅक्शनवर आंतरराष्ट्रीय दर्जाचं काम करण्यात आल्याचं स्पष्ट दिसतं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments