Video: लग्नाविषयी विचारताच श्रद्धा कपूरने दिले हे उत्तर, म्हणाली…

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने काही दिवसांपूर्वी गर्लफ्रेंड नताशा दलालशी लग्न केले. त्यांच्या लग्नानंतर आता बॉलिवूडमधील कोणतं कपल लग्न करणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान अभिनेत्री श्रद्धा कपूर लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. फोटोग्राफरने देखील श्रद्धाला लग्नाच्या प्लॅनविषयी विचारले असता तिने मराठीमध्ये उत्तर दिले आहे.

श्रद्धा कपूर नुकताच एअरपोर्टजवळ दिसली होती. फोटोग्राफर तिचे फोटो काढत होते. दरम्यान एका फोटोग्राफरने तिला लग्न कधी करणार असा प्रश्न विचारला आहे. त्यावर श्रद्धाने ‘काय म्हणतोय’ असे मराठीत उत्तर दिले. त्यानंतर तिला हसू येतं.

गेल्या काही दिवसांपासून श्रद्धा कपूर छायाचित्रकार रोहन श्रेष्ठाला डेट करत असल्याची चर्चा रंगली होती. इतकच नाही तर गेल्या वर्षी ही जोडी लग्न करणार असल्याचे देखील म्हटले जात होते. याविषयी सोशल मीडियावरही चर्चांना चांगलेच उधाण आले होते. मात्र, अद्याप तरी या दोघांनी याविषयी मौन बाळगले आहे. परंतु, तरीदेखील चाहत्यांमध्ये त्यांच्या अफेअरची जोरदार चर्चा आहे.

- Advertisement -

- Advertisement -