Friday, March 29, 2024
Homeट्रेंडिंगस्टेशनवर गाणा-या ‘रानू मंडाल’च आयुष्य या व्यक्तीने बदलले

स्टेशनवर गाणा-या ‘रानू मंडाल’च आयुष्य या व्यक्तीने बदलले

रेल्वे स्टेशनवर गात भीक मागून पोटाची खळगी भरणा-या रानू मंडाल हिचे आयुष्य एका क्षणात बदलले. रस्त्यावरून ती थेट बॉलिवूडच्या स्टुडिओपर्यंत पोहोचली. बॉलिवूडचा दिग्गज संगीतकार व गायक हिमेश रेशमिया याच्या चित्रपटासाठी तिने पहिले गाणे रेकॉर्ड केले आणि रानू मंडलला देशभरात वेगळी ओळख निर्माण झाली.

एका व्यक्तीने रस्त्यावर गातांनाचा रानूचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला. तो व्हायरल झाला आणि रानूच्या नशीबाने कलाटणी घेतली. सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करणा-या त्या व्यक्तिला रानू कधीच विसरू शकणार नाही. तिच्या आयुष्यात ‘देवदूत’ बनून आलेली ही व्यक्ती कोण हेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तर या व्यक्तिचे नाव आहे, एतींद्र चक्रवर्ती.

रानू पश्चिम बंगालच्या रानाघाट स्टेशनव गाणी गात स्वत:च पोट भरत असे. अनेक जण तिच्या मधूर आवाजाने मंत्रमुग्ध होत. काहीजण तिचे कौतुक करत तर काही जण तिच्या हातात चार-दोन रूपये टिकवून पुढे चालते होत. पण एतींद्र चक्रवर्तीने एक दिवस रस्त्यावर गाणाºया रानूला गाताना बघितले आणि तिचा गातानाचा व्हिडीओ घेतला. रानूलता मंगेशकर यांचे ‘एक प्यार का नगमा’ हे गीत गात होती. एतींद्रने तिचा व्हिडीओ बनवला आणि आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला. तो इतका व्हायरल झाला की, या व्हिडीओने रानूचे आयुष्य बदलले.

रानूचा हा व्हिडीओ पाहून बॉलिवूडमधून तिला गाण्याच्या आॅफर्स यायला लागल्या. हिमेश रेशमिया याने रानूला पहिली संधी दिली. रानूने बॉलिवूड स्टुडिओत पहिले गाणे रेकॉर्ड केले, त्यावेळी एतींद्र सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होता. रानूला ही संधी दिल्याबद्दल एतींद्र्रने हिमेशचे आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments