Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeट्रेंडिंगरिलायन्स जीओच्या बहुप्रतिक्षित गिगा फायबर इंटरनेट सेवेची आज अधिकृत घोषणा

रिलायन्स जीओच्या बहुप्रतिक्षित गिगा फायबर इंटरनेट सेवेची आज अधिकृत घोषणा

मुंबई : रिलायन्स जीओच्या बहुप्रतिक्षित गिगा फायबर इंटरनेट सेवेची आज अधिकृत घोषणा करण्यात आली. येत्या 5 सप्टेंबर पासून ही सेवा उपलब्ध होणार आहे. रिलायन्स जीओच्या 42 व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत मुकेश अंबानी यांनी आज ही घोषणा केली.या सेवेत आता ग्राहक चित्रपट रिलीज होताच त्याचं दिवशी घरी बसून आपला आवडता चित्रपट पाहता येणार आहे. जिओने या सेवेला ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ असे नाव दिले आहे. इतकेच नाही तर ‘जिओ गीगा फायबर’ मध्ये मल्टी-पार्टी व्हिडीओ कॉन्फरन्स कॉल, लाइव्ह गेमिंग आणि स्मार्ट होम सोल्यूशन सारख्या सुविधा देखील दिल्या आहेत.

जीओच्या मोबाईल इंटरनेट सेवेची तीन वर्षापूर्वी सुरुवात करण्यात आल्यानंतर देशभरात एक प्रकारे इंटरनेट क्रांती घडून आल्याचं पाहायला मिळालं. या सेवेला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. त्यानंतर गेल्या अनेक महिन्यांपासून जीओच्या ब्रॉडबँड इंटरनेट सेवेबद्दल लोकांमध्ये उत्सुकता होती. गेल्या वर्षभरापासून भारतातील महत्त्वाच्या शहरांमध्ये या सेवेची चाचणी सुरु होती. देशातील जवळपास 5 लाख घरांमध्ये या सेवेची जोडणी देण्यात आली होती, अशी माहिती मुकेश अंबानी यांनी बोलताना दिली.

जिओची ही गीगा फायबर इंटरनेट सेवा येत्या 5 सप्टेंबर पासून अधिकृतपणे सुरु होणार आहे. पुढच्या 1 वर्षात देशभरात या सेवेचं जाळं पसरवण्यासाठी कंपनी प्रयत्न करणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments