Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedकंगनाच्या अडचणीत वाढ, प्रताप सरनाईकांकडून कंगनाविरोधात हक्कभंग प्रस्ताव

कंगनाच्या अडचणीत वाढ, प्रताप सरनाईकांकडून कंगनाविरोधात हक्कभंग प्रस्ताव

मुंबई l प्रताप सरनाईक यांच्या घऱी पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडल्याचा आरोप कंगनाने केला आहे. याविरोधात प्रताप सरनाईक यांनी आक्रमक भूमिका घेतली असून हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

टॉप्स ग्रुप (सिक्युरिटी) कंपनीचे प्रमुख राहुल नंदा यांच्या कथित आर्थिक गैरव्यवहारांबाबत तपास करणाऱ्या सक्तवसुली संचालनालयाकडून शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे. एकीकडे प्रताप सरनाईक यांची चौकशी सुरु असताना अभिनेत्री कंगना रणौतने गंभीर आरोप केले आहेत.

अभिनेत्री कंगना रणौतने एक ट्विट केलं होतं, ज्यामध्ये मुंबईत आल्यानंतर तोंड फोडण्याची गोष्ट करणाऱ्यांच्या घरी पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडलं आहे. तिच्या ट्विटच्या आधारे अनेकांनी बातम्या केल्या. ईडीच्या कोणत्याही अधिकाऱ्याने घरी काय सापडलं याची माहिती दिलेली नाही. कंगनाकडून अशा पद्धतीचं बदनामी करणं चुकीचं आहे,” असं प्रताप सरनाईक यांनी यावेळी सांगितलं.

“ईडीच्या माध्यमातून माझी आणि कुटुंबीयांची संपूर्ण देशभरात बदनामी करण्याचा प्रयत्न आहे. अभिनेत्री कंगना रणौत यांनी माझ्याविरोधात खोटं ट्विट केलं. यामुळे कंगना रणौत तसंच त्याबद्दल बातम्या प्रसिद्ध करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक, प्रिंट आणि सोशल मीडिया यांच्याविरोधात मी हक्कभंग दाखल केला आहे.

कंगनाच्या ट्विटच्या आधारे ज्या मीडियाने खोट्या बातम्या प्रसिद्ध केल्या त्यांच्याविरोधातील हक्कभंग प्रस्ताव मान्य करावा अशी विनंती मी अध्यक्षांना केली आहे,” अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी यावेळी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments