अफगाणिस्तानमध्ये आत्मघाती हल्ला, ११ जण जखमी

- Advertisement -

जलालाबाद – अफगाणिस्तानच्या जलालाबाद शहरामध्ये झालेल्या आत्मघाती बॉम्ब हल्ल्यात ११ लोक जखमी झाले आहेत. नानगारहर प्रोव्हीन्स या भागातील ‘सेव्ह दी चिल्ड्रेन’ या संघटनेच्या कार्यालयाबाहेर बुधवारी हा आत्मघाती हल्ला करण्यात आला.

या संघटनेच्या गेटवर एका आत्मघाती हल्लेखोराने हा बॉम्बस्फोट घडवला. बंधुकधाऱ्यांना वाट करुन देण्यासाठी या आत्मघाती हल्लेखोराने हा स्फोट घडवल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. बंडखोर आणि सुरक्षा दलांमध्ये सध्या संघर्ष सुरू आहे. या संघर्षातून हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.

- Advertisement -