होम विदेश आँग स्यू की यांच्या निवासस्थानावर ‘पेट्रोल बॉम्ब’ हल्ला

आँग स्यू की यांच्या निवासस्थानावर ‘पेट्रोल बॉम्ब’ हल्ला

12
0
शेयर

रंगून: म्यानमारच्या रंगून शहरामधील स्टेट कॉन्सिलर आँग स्यू की यांच्या निवासस्थानाच्या कंपाऊंडमध्ये पेट्रोलबॉम्ब टाकल्याची घटना घडली. आँग स्यू की यांच्या सल्लागार कार्यालयाचे महानिरीक्षक यू जा हैटे यांनी या वृताला दुजोरा दिला आहे.

या हल्ल्यावेळी आग लागण्याची शक्यता होती. मात्र, या पेट्रोल बॉम्ब हल्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. हैटे यांनी पुढे म्हटले, की आँग स्यू की या हल्ल्यावेळी त्यांच्या निवासस्थानी नव्हत्या. तर त्या ना पिई ताव येथे होत्या. दरम्यान या पेट्रोल बॉम्ब हल्ल्यामागील उद्देश अस्पष्ट असल्याचे सुत्रांनी सांगितले.