कचऱ्याच्या डब्यात सापडलं अवघं १२ तासांचं स्त्री अर्भक

- Advertisement -

चिआंग मई: थायलंडमधील चिआंग मई शहरात कचऱ्याच्या डब्यात एका पिशवीत गुंडाळलेलं स्त्री अर्भक सापडलं. रविवारी रात्री ८ च्या सुमारास हे बाळ सापडलं असून त्यावेळेस ती अवघी १२ तासांची होती. इतका वाईट प्रकार कोणी केला, असा संताप स्थानिक व्यक्त करित आहे. सोबत त्या मुलीसाठी करुणाही व्यक्त केली जात आहे.

घटनास्थळी असलेल्या लोकांना बाळाच्या रडण्याचा आवाज येत होता. त्यांनी हा आवाज नेमका कुठून येतोय हे पाहण्यासाठी शोधाशोध सुरू केली तेव्हा हा प्रकार उघडकीला आला. एका ब्लँकेटमध्ये गुंडाळून तिला बॅगेत टाकण्यात आलं होतं. त्यानंतर बॅग कचऱ्याच्या डब्यात फेकण्यात आली. सुदैवाने ती आता सुखरुप आहे.

- Advertisement -