होम विदेश बलात्काराच्या निषेधासाठी महिला अॅंकर स्वतःच्या चिमुकलीसोबत!

बलात्काराच्या निषेधासाठी महिला अॅंकर स्वतःच्या चिमुकलीसोबत!

14
0
शेयर

कराची : पाकिस्तानमध्ये एका वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणाचे पडसाद सध्या देशभरात उमटले आहे. या घटनेच्या निषेधार्थ समा वृत्तवाहिनीची अँकर किरण नाज यांनी आपल्या मुलीला घेऊन स्टुडिओमध्ये बुलेटिनला सुरुवात केली.  “तुम्ही पाहताय बुलेटिन ते , मी आहे तुमची अँकर किरण नाज…पण आज मी अँकर नाही तर एक आई आहे…” असं म्हणत पाकिस्तानमधील समा वृत्तवाहिनीच्या एका महिला अँकरने एका चिमुरडीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाचा निषेध केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे.

किरण नाजने बुलेटिनची सुरुवात नेहमी प्रमाणे केली, पण मी आज एक अँकर नाही तर एका मुलीची आई आहे. त्यामुळे मी इथं माझ्या मुलीसह आहे. त्यानंतर किरण नाजने भावनिक आवाहन केलं ते ऐकून कुणालाही गहिवरून येईल. ती म्हणते, कहा जाता है कि जनाज़ा जितना छोटा होता है, उतना ही भारी होता है. और ऐसा ही नन्हा सा जनाज़ा आज कसूर की सड़कों पर रखा है और पूरा पाकिस्तान इसके बोझ तले दबा हुआ है.”

काय आहे प्रकरण –
पाकिस्तानमध्ये सात वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली. याघटनेचा निषेध करण्यासाठी लोक रस्त्यावर उतरलेत. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात ही घटना घडली आहे. ही घटना समोर आल्यानंतर स्थानिकांनी पोलिसांविरुद्ध हिंसक आंदोलन केलं. पाकिस्तानी वृत्तपत्र ‘ द डॉन’ च्या वृत्तानुसार पंजाब प्रांतातील कासुर जिल्ह्यात काल पीडित मुलीवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर लोक रस्त्यावर उतरले. त्यांनंतर या आंदोलनानं हिंसक वळण घेतलं आहे.  या हिंसाचारात दोन जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.


दरम्यान, या घटनेच्या विरुद्ध इथली जनता रस्त्यावर उतरली आहे.सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने हाती आलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात कासुर जिल्ह्यातील राहत्या घरासमोरून चिमुरडीचं अपहरण करण्यात आले होते. मंगळवारी तिचे शव कचऱ्याच्या ढिगात आढळले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत मुलीचं शव ताब्यात घेतलं. त्यानंतर शवविच्छेदनासाठी पाठविलं. शवविच्छेदनात बलात्कारानंतर गळा दाबून या चिमुरडीची हत्या करण्यात आल्याची बाब उघड झाली आहे.

पीडित मुलीचे आई-वडील तिर्थयात्रेसाठी गेले असताना ही घटना घडली. आई-वडील घरी नसल्याने चिमुरडी आपल्या नातेवाईकांसोबत राहत होती. दरम्यान, पोलिसांनी या घटनेत चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.