होम विदेश मोदींच्या हस्ते अबूधाबीत हिंदू मंदिराचं भूमिपूजन

मोदींच्या हस्ते अबूधाबीत हिंदू मंदिराचं भूमिपूजन

11
0
शेयर

दुबई: यूएईच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी दुबईतील ओपेरा हाऊसमध्ये पोहोचले. तेथून त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अबूधाबीतील पहिल्या हिंदू मंदिराचे भूमिपूजन केले. बीएपीएस संस्थेद्वारे हे मंदिर उभारण्यात येत आहे.

यावेळी मोदींनी यूएईमध्ये राहणाऱ्या भारतीयांना संबोधित केले. ‘अनेक दशकांनंतर भारताचे आखाती देशांसोबतचे नाते इतके दृढ झाले आहे. भारत ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’मध्येही प्रगती करत आहे. ३० लाखांहून अधिक भारतीय नागरिक येथील विकासाचे भागीदार झाले आहेत, याचा सार्थ अभिमान वाटतो.’, असे मोदी म्हणाले.
हिंदू मंदिर उभारणीस मान्यता दिल्याने मी भारतातील सव्वाशे कोटी जनतेच्या वतीने अबूधाबीचे राजे मोहम्मद बिन झायेद अल नहयान यांचे आभार मानतो, असे मोदी म्हणाले. हे मंदिर केवळ वास्तुशिल्पकलेचा उत्तम नमुना नसून ते जगाला ‘वसुधैव कुटुंबकम्’चा संदेश देणारे आहे, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.