१२ वर्षांच्या मुलाने पॉर्नस्टारला मेसेज पाठवून केली “ही” मागणी‘

- Advertisement -

पॅरिस – इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे माहितीचा खजिना सर्वांसाठी खुला झाला आहे. त्याबरोबरच लहान मुलेही इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात करू लागल्याने न कळत्या वयात नको ती माहिती त्यांच्या हाती लागू लागली आहे. इंटरनेटवर पॉर्न व्हिडिओ सहज हाती लागत असल्याने कुतूहलापोटी पॉर्न व्हिडिओ पाहणाऱ्या लहान मुलांचं प्रमाणही लक्षणीय आहे. अशाच एका 12 वर्षांच्या मुलाने पॉर्न व्हिडिओ पाहून एका पॉर्नस्टारला मेसेज पाठवला आणि तिच्याशी सेक्स करण्याची इच्छा व्यक्त केली.

28 वर्षांच्या निकिता बलुची नामक पॉर्नस्टारने या संदर्भातील एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये तिने एका लहान मुलाने मेसेज पाठवून आपल्याशी सेक्स करण्याची इच्छा व्यक्त केल्याचे म्हटले आहे. तसेच मुलाला पॉर्नोग्राफीपासून दूर न ठेवल्याने त्या मुलाचा आई-वडिलांना खडेबोल सुनावले आहेत. पॉर्नस्टार निकिता बलुची हिचे ट्विटरवर 1 लाख 60 हजार फॉलोअर्स आहेत. यापैकी चार अल्पवयीन मुलांच्या मेसेजचे फोटो निकिता हिने ट्विट केले आहेत. त्या मेसेजमध्ये ही मुले या पॉर्नस्टारजवळ सेक्सची मागणी करत आहेत.
त्यापैकी एका मुलाने निकिताला केलेल्या मेसेजमध्ये लिहिले आहे की, ” हाय, मी आता 13 वर्षांचा होणार आहे. मी तुमचा चाहता आहे. तू माझ्यासोबत सेक्स करशील का?” या मेसेजला निकितानेही उत्तर दिले आहे. ती या मुलाला पाठवलेल्या मेसेजमध्ये म्हणते,” ए 13 वर्षांच्या मुला, तू स्वत:चा अभ्यास कर, यापुढे मला मेसेज पाठवत जाऊ नकोस. चुकून जर पुन्हा मेसेज पाठवलास तर मी त्या मेसेजचा स्क्रीनशॉट तुझ्या आईवडिलांना पाठवेन. निकिताची ही पोस्ट 14 हजारहून अधिक जणांनी लाईक केली आहे.

- Advertisement -