Friday, March 29, 2024
Homeदेशकुलभूषण जाधव २५ डिसेंबरला आई आणि पत्नीला भेटणार

कुलभूषण जाधव २५ डिसेंबरला आई आणि पत्नीला भेटणार

महत्वाचे…
१.कुलभूषण जाधव यांना हेरगिरीच्या आरोपाखाली केली अटक २. कुटुंबियांना भेटण्याची परवानगी दिल्याची माहिती पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैसल यांनी दिली ३. कुलभूषण यांच्या आई आणि पत्नी पाकिस्तानात असताना त्यांना कोणताही त्रास दिला जाणार नाही, त्यांची कोणतीही चौकशी केली जाणार नाही


नवी दिल्ली: कुलभूषण जाधव यांना त्यांच्या आई व पत्नीला भेटण्याची परवानगी देण्यात आल्याच्या वृत्ताला शुक्रवारी पाकिस्तानकडून दुजोरा देण्यात आला. त्यानुसार येत्या २५ डिसेंबरला कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नी त्यांची भेट घेतील. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैसल यांनी ही माहिती दिली. पाकिस्तानने गेल्यावर्षी नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना हेरगिरीच्या आरोपाखाली अटक केली होती.

‘जिओ न्यूज’नुसार, कुलभूषण जाधव आणि पत्नी-आईच्या भेटीवेळी भारतीय दूतावासाचे अधिकारीही उपस्थित असतील, असे फैजल यांनी सांगितले. दरम्यान, पाकिस्तानने गेल्या महिन्यात जाधव यांना पत्नीची भेट घेण्यास परवानगी दिली होती. पाकिस्तानने मानवतेच्या आधारावर हा निर्णय घेतला होता. त्यानंतर जाधव यांना आईलाही भेटण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी भारताने पाकिस्तानकडे केली होती. तसेच आई आणि पत्नीच्याही सुरक्षेची हमी देण्यास सांगितले होते.कुलभूषण यांच्या आई आणि पत्नी पाकिस्तानात असताना त्यांना कोणताही त्रास दिला जाणार नाही, त्यांची कोणतीही चौकशी केली जाणार नाही, अशी हमी भारताने पाकिस्तानकडे मागितली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments