Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeविदेशअफगाणिस्तानमध्ये आत्मघाती बॉम्बस्फोटात ३१ ठार

अफगाणिस्तानमध्ये आत्मघाती बॉम्बस्फोटात ३१ ठार

Bomb attack, Afganistanकाबूल-अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूलमध्ये मतदार आणि ओळखपत्र नोंदणी कार्यालयाबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटात  ३१ जण ठार तर  ५० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यामुळे देशात २० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या निवडणुकांसाठी सुरक्षेबाबतची चिंता वाढली आहे.

टोलो न्यूज या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार हा स्फोट केंद्राच्या प्रवेशद्वारावर घडला. हा आत्मघातील हल्ला होता. त्यात अनेकांचा बळी गेला, असे काबूल पोलिसांचे प्रमुख दाऊद अमीन यांनी सांगितले. तर सध्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. या केंद्रावर नागरिकांच्या राष्ट्रीय ओळखपत्रांची नोंदणी करण्यात येते. हल्ल्याचे नव्याने लक्ष्य बनवण्यात आलेले हे केंद्र काबूल शहराच्या पश्चिमेतील शियाबहूल भागात आहे. अफगाणिस्तानामध्ये दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या निवडणुकांसाठी १४  एप्रिल पासून नोंदणी सुरू करण्यात आली होती. या निवडणुकांमध्ये सुरक्षा व्यवस्था हा चिंतेचा विषय ठरणार असल्याची भीती निवडणूक अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, आज झालेल्या हल्ल्याची जबाबदारी कुठल्याही संघटनेने स्वीकारलेली नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments