Friday, March 29, 2024
Homeविदेशकाबूलमध्ये बॉम्बस्फोटात ४० ठार

काबूलमध्ये बॉम्बस्फोटात ४० ठार

काबूल: अफगाणिस्तानची राजधानी काबूल हे शहर गुरुवारी बॉम्बस्फोटाने हादरले. काबूलमधील पूल सोखतिया या परिसरात हा स्फोट झाला असून या स्फोटात किमान ४० जणांचा मृत्यू झाला आहे. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

काबूलमध्ये कल्चरल सेंटरमध्ये गुरुवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास दहशतवाद्यांनी हल्ला केला. कल्चरल सेंटरचा परिसर बॉम्बस्फोटांच्या आवाजाने हादरुन गेला. आत्मघाती दहशतवाद्यांनी कल्चरल सेंटरच्या तळमजल्यावर हल्ला केला. तळमजल्यावरील सभागृहात किमान १०० जण उपस्थित होते. दोन दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याचे प्राथमिक वृत्त आहे. हल्ल्यानंतर काही वेळाने दोन्ही दहशतवाद्यांनी स्वत:ला बॉम्बने उडवून दिले. याच इमारतीमध्ये इराणमधील एका न्यूज एजन्सीचे देखील कार्यालय आहे. महिला, लहान मुले आणि पत्रकार यांचा मृतांमध्ये समावेश आहे. या हल्ल्यात ३० जण जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दहशतवाद्यांनी हल्ल्यादरम्यान ग्रेनेड फेकल्याचे समजते. या हल्ल्यामागे आमचा हात नाही, असे तालिबानने स्पष्ट केले. दरम्यान, याच आठवड्यात काबूलमध्ये आयसिस या दहशतवादी संघटनेने केलेल्या हल्ल्यात १० जणांचा मृत्यू झाला होता. एनडीएसच्या कार्यालयाजवळ हा हल्ला झाला होता. २० ऑक्टोबररोजीही आयसिसने काबूलला लक्ष्य केले होते. दोन मशिदींबाहेर हा स्फोट झाला होता. यात १२ जणांचा मृत्यू झाला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments