Friday, March 29, 2024
Homeविदेश'हाफिजच्या हत्येसाठी कडून ८ कोटीची सुपारी'!

‘हाफिजच्या हत्येसाठी कडून ८ कोटीची सुपारी’!

महत्वाचे…
१.पाकिस्तानच्या राष्ट्रीय दहशतवाद विरोधी पथकाकडून सुरक्षा खात्यात वाढ २. अमेरिकेनं हाफिज सईदला २०१४ सालीचं आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले ३. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरुन सातत्याने पाकिस्तानने हाफिज सईदचा बचाव केला.


इस्लामाबाद : मुंबई २६/११ हल्ल्याचा मास्टरमाइंड दहशतवादी हाफिज सईदच्या खात्म्यासाठी अनेक परदेशी यंत्रणांनी कंबर कसल्याची माहिती आहे. परदेशी यंत्रणांनी हाफिजच्या हत्येसाठी आठ कोटीची सुपारी दिली असल्याचा दावा पाकिस्ता दहशतवाद विरोधी पथकाने केला आहे.

पाकिस्तानच्या राष्ट्रीय दहशतवाद विरोधी पथकानं पाकिस्तानच्या सुरक्षा खात्याला हाफिज सईदच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याचे लेखी आदेश दिले आहेत. यात हाफिज सईदच्या खात्म्यासाठी एका आंतरराष्ट्रीय गुप्तचर यंत्रणेनं ८ कोटी रुपये दिले असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. जानेवारी महिन्यापासून जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईदला लाहोरमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आलं. तर अमेरिकेनं हाफिज सईदला २०१४ सालीचं आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलं होतं. हाफिजला संपूर्ण जगानं दहशतवादी ठरवलं असलं, तरी पाकिस्तान अद्याप हाफिज सईद दहशतवादी असल्याचं मान्य करायला तयार नाही. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरुन सातत्याने पाकिस्तानने हाफिज सईदचा बचाव केला आहे.

मुंबई हल्ल्याप्रकरणीही भारताने सातत्याने हाफिज सईदला ताब्यात देण्याची  पाकिस्तानकडे मागणी केली आहे. पण पाकिस्तानकडून ही मागणी अमान्य करण्यात आली आहे. दुसरीकडे एक हजारपेक्षा जास्त मुस्लीम धर्मगुरुंनी हाफिज सईदवर कारवाईची मागणी केली आहे. या मुस्लीम धर्मगुरुंनी थेट संयुक्त राष्ट्राला पत्र लिहून हाफिज सईदच्या भारतविरोधात कारवाया प्रकरणी कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments