Friday, March 29, 2024
Homeविदेशशाळा गोळीबार प्रकरण: अमेरिकेत लाखो नागरिक रस्त्यावर!

शाळा गोळीबार प्रकरण: अमेरिकेत लाखो नागरिक रस्त्यावर!

US Fire

वॉशिंग्टन : जगात सर्वाधिक शस्त्रास्त्रे निर्यात करणाऱ्या अमेरिकेतच नागरिकांनी आता बंदूक संस्कृतीवर लगामासाठी आंदोलनाचे पाऊल उचलले आहे. शाळामध्ये गोळीबार होण्याच्या घटनांनी चिंतित झालेल्या लाखो नागरिकांनी रस्त्यावर उतरत निदर्शने केली.

गतवर्षी फ्लोरिडा स्कूलमध्ये मोठ्या प्रमाणात गोळीबार झाल्याची घटना घडली होती. त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांचा नाहक बळी गेला होता, तर अनेक विद्यार्थी जखमी झाले होते. अशातच अमेरिकेची राजधानी असलेल्या वॉशिंग्टनमध्ये लाखो नागरिकांनी बंदूक संस्कृतिविरोधात निदर्शने केली आहेत.
यासाठी वॉशिंग्टनमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी मोर्चेकरी नियोजित वेळेच्या तीन तास आधी पोहोचले. यावेळी त्यांनी ‘आमचे मतदान, आमचे सर्वात मोठे हत्यार’ अशा आशयाचे फलक हाती घेतले होते. संसदेमध्ये बंदूक संस्कृतीला लगाम घालणारा कायदा करावा, यासाठी विद्यार्थ्यांनी अनेक ठिकाणी मोर्चे काढले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments