Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeविदेशकनाडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडोंच्या पत्नींना कोरोनाची लागण

कनाडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडोंच्या पत्नींना कोरोनाची लागण

Canada Prime Minister wife suffers from corona, corona prime minister wife, coronavirus, corona, canadaकनाडा : जगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून कनाडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या पत्नी सोफी यांनाही कोरोनाची लागन झाली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. जगभरात कोरोना बाधितांची संख्या १ लाख २४ हजारावर पोहोचली आहे.

पंतप्रधान जस्टिन यांच्या पत्नी गुरुवारी ब्रिटनमधून एका कार्यक्रमातून परतल्या होत्या. त्यानंतर त्यांना त्रास व्हायला सुरुवात झाली. ताबडतोब त्यांची तपासणी करण्यात आली. त्या तपासणीमध्ये त्यांना कोरोना झाल्याचे निष्पण झाले.

जगभरात कोरोनामुळे ४,५५० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. नागरिकांमध्ये भीती कायम असून सार्वजिनक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे विशेष म्हणजे शेअर बाजारालाही त्याचा मोठा फटका बसला आहे. सध्या नागरिकांमध्ये जनजागृतीचे काम जोरात सुरु असून जागतिक स्तरावर आर्थिक फटकाही मोठ्या प्रमाणावर बसला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments