Placeholder canvas
Thursday, April 18, 2024
Homeविदेशधक्कादायक! नॉर्वेत लस घेतल्यानंतर २९ जणांचा मृत्यू

धक्कादायक! नॉर्वेत लस घेतल्यानंतर २९ जणांचा मृत्यू

नार्वे : जगभरात कोरोना लसीची मोहिम सुरु असताना नॉर्वेमध्ये धक्कादायक प्रकार समोर आलं आहे. नॉर्वेमध्ये करोना लसीकरणाला सुरूवात झाली असून, डिसेंबरच्या अखेरीपासून आतापर्यंत २५ हजाराहून अधिक लोकांना लस देण्यात आली आहे. मात्र, चिंतेची बाब म्हणजे लस घेतल्यानंतर नॉर्वेत २९ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर ७५ पेक्षा अधिक नागरिकांची प्रकृती चिंताजनक आहे.

करोनाविरोधातील लढाई निर्णायक ठरणाऱ्या लस तयार करण्यात अनेक कंपन्यांना यश आलं आहे. अनेक देशांमध्ये लसींच्या आपत्कालीन वापरासाठीही परवानगी देण्यात आली असून, लसीकरण अभियानही सुरू करण्यात आलं आहे. याच दरम्यान, लसीकरण मोहीम राबवण्यात येत असलेल्या नॉर्वेत लस घेतल्यानंतर २९ जणांचा मृत्यू झाला आहे. फायझर बायोएनटेकची लस घेतल्यानंतर या घटना घडल्या आहेत.

डिसेंबर २७ पासून नॉर्वेत लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. आतापर्यंत २५ हजारांपेक्षा जास्त नागरिकांना लस देण्यात आली असून, फायझर बायोएटेकची लस घेतल्यानंतर अनेकांना त्रास सुरू झाल्याचं समोर आलं. यात शनिवारी २९ नागरिकांचा लसीकरणानंतर मृत्यू झाला आहे. तर ७५ पेक्षा अधिक नागरिकांची प्रकृती चिंताजनक असल्याचं ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

मृतांमध्ये ७५ ते ८० वयोगटातील वृद्ध नागरिकांचा समावेश आहे. बहुतांश मृत्यू हे गंभीर आजार असलेल्या नागरिकांचे झाले आहेत. लस घेतल्यानंतर या नागरिकांना उलटी, ताप यासारखा त्रास जाणवला होता. नॉर्वेमध्ये फायझर बायोएनटेक तयार केलेली लसच उपलब्ध झालेली आहे. लसीकरणानंतर झालेले मृत्यू या लसीशी संबंधितच आहे. १३ जणांच्या मृत्यूची चौकशी करण्यात आली असून, उर्वरित १६ जणांच्या मृत्यूचं कारण शोधलं जात आहे, असं नॉर्वे मेडिसीन यंत्रणेनं ब्लूमबर्गला माहिती देताना म्हटलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments