Placeholder canvas
Thursday, April 18, 2024
Homeविदेशबापरे : फायजरची कोरोना लस घेणा-या डाक्टरचा १६ दिवसांनंतर मृत्यू!

बापरे : फायजरची कोरोना लस घेणा-या डाक्टरचा १६ दिवसांनंतर मृत्यू!

वॉशिंग्टन: जगभरात कोरोनाचा कहर सुरु आहे. कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये लसीकरण सुरू करण्यात आले आहे. मात्र, लशीचे काही दुष्परिणाम समोर येत आहेत. लस घेतल्यानंतर एका डॉक्टरचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मियामीतील डॉक्टर ग्रेगरी मायकल (५६) यांनी कोरोना लस घेतल्यानंतर १६ दिवसांनी त्यांचा मृ्त्यू झाल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे.

डॉक्टर ग्रेगरी मायकल यांनी फायजरची लस घेतली होती. त्यांची पत्नी हेइदी नेकेलमान यांनी सांगितले की, १८ डिसेंबर रोजी ग्रेगरी यांनी लस घेतली. त्याआधी त्यांची प्रकृती ठणठणीत होती. इतकंच नव्हे तर त्यांना कोणताही आजार नव्हता. लस घेतल्यानंतर ग्रेगरी यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याचे त्यांनी सांगितले.

डॉक्टर ग्रेगरी यांना रोगप्रतिकार क्षमतेशी निगडीत दुर्मिळ आजार झाल्यानंतर रविवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. करोनाच्या लशीमुळे हा आजार झाला असल्याचा आरोप ग्रेगरी यांच्या पत्नीने केला. हेईदी नेकेलमान यांनी ‘डेली मेल’ ला सांगितले की, डॉक्टर ग्रेगरी यांच्या मृत्यूचा थेट संबंध लशीसोबत आहे. लस घेतल्यानंतरच त्यांना आजार झाला आणि त्यांचा मृत्यू झाला असल्याचे हेईदी यांनी म्हटले.

हेईदी यांनी सांगितले की, डॉक्टर ग्रेगरी यांची प्रकृती चांगली होती. सिगरेट त्यांनी कधीच घेतली नाही. तर, एखाद्या वेळेस काही प्रमाणात मद्य घेत असे. दररोज व्यायामही करायचे असेही त्यांनी म्हटले. शीमुळे डॉक्टर ग्रेगरी यांचा मृत्यू झाला असे आम्ही मानत नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

डॉक्टर ग्रेगरी यांच्या मृत्यूची चौकशी सुरू असल्याचे फायजरने सांगितले आहे. लस घेतल्यानंतर ग्रेगरी यांच्या प्रकृतीत कोणताही साइड इफेक्ट आढळून आला नाही. तीन दिवसानंतर त्यांच्या शरीरावर लाल चट्टे पडले असल्याचे ग्रेगरी यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी स्वत: माउंट सिनोई मेडिकल सेंटरमध्ये तपासणी केली. त्यावेळी त्यांच्या शरीरात प्लेटलेट्सची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली असल्याचे दिसून आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments