मुगाबे राजवट संपुष्टात, राष्ट्राध्यक्षपदाचा दिला राजीनामा!

- Advertisement -

हरारे – झिम्बाब्वेचे रॉबर्ट मुगाबे यांनी अखेर आपल्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने देशातील ३७ वर्षांची मुगाबे राजवट संपुष्टात आली आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे देशभरात जल्लोष साजरा करण्यात येत आहे.

ब्रिटनकडून १९८० मध्ये स्वातंत्र्य मिळाल्याने मुगाबे १९८७ पर्यंत देशाचे पंतप्रधान राहिले. त्यानंतर ते १९८७ ते २०१७ पर्यंत ते राष्ट्राध्यक्ष झाले. अखेर त्यांच्यावर झिम्बाब्वेच्या संसदेत महाभियोगाची कारवाई सुरू झाल्यानंतर त्यांनी मंगळवारी राजीनामा दिला, असे संसदीय प्रवक्तांनी माहिती दिली.
ब्रिटीशविरोधात लढा देण्यासाठी मुगाबे आणि त्यांच्या झिम्बाब्वे अफ्रिकन नॅशनल युनियन पक्षाने स्वातंत्र्यासाठी लढा उभा केला. मार्क्स आणि लेनिन विचारसरणीने प्रेरित झालेले मुगाबे यांच्याविरोधात देशभरात असंतोष होता.

- Advertisement -