इराण-इराक सीमेला भूकंपाचा धक्का; १६४ जणांचा मृत्यू

- Advertisement -

बगदाद :  ७.३ रिश्टर स्केलच्या जोरदार भूकंपाच्या धक्क्याने इराण व इराकची सीमा रविवारी रात्री ९.२० च्या सुमारास हादरून गेली. भूकंपाचा केंद्रबिंदू इराकमधील हलब्जापासून ३२ किमी अंतरावर असल्याचे अमेरिकेच्या भूगर्भतज्ज्ञांनी सांगितले. सीमेवरील या तीव्र भूकंपामुळे १६४ लोकांचा मृत्यू झाला असून १६०० हून अधिक जखमी आहेत. 

या भूकंपाचा प्रभाव इराणमधील १४ राज्यांमध्ये दिसून येत आहे. रात्रीच्या वेळी झालेल्या भूकंपाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, भुकंपानंतर लाईट गेल्याने मदत कार्य करण्यास अडचणी येत होत्या. भूकंप प्रभावित सर्व राज्यात आज शाळा, महाविद्यालये बंद राहणार असल्याची घोषणा इराण सरकार कडून करण्यात आली आहे. इराणला यापूर्वी २००३ मध्ये भूकंपाचा तीव्र धक्का बसला होता.

इराक 
इराकच्या कुर्दस्तान क्षेत्रातील सुलेमियांह शहरापासून ७५ किमी पूर्वेला दर्बिंदिक्षण शहरात तीव्र स्वरूपाचा भूकंप जाणवला. यासोबतच उत्तरी इराक मध्येसुद्धा अशाच प्रकारचे  भूकंपाचे धक्के जाणवले.

- Advertisement -

तुर्की
तुर्की च्या दक्षिणेकडील डाइरबकिरी या शहरातसुद्धा तीव्र स्वरूपाच्या भूकंपाचा धक्का जाणवला. मात्र, नुकसानीचा अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध नाही.

- Advertisement -