Thursday, March 28, 2024
Homeविदेशअमेरिकेत माजी विद्यार्थ्याच्या अंदाधुंद गोळीबारात, १७ ठार

अमेरिकेत माजी विद्यार्थ्याच्या अंदाधुंद गोळीबारात, १७ ठार

फ्लोरिडा: अमेरिकेतील फ्लोरिडामधील पार्कलँड येथील शाळेत एका माजी विद्यार्थ्यांने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात १७ विद्यार्थी ठार तर २० हून अधिक जण जखमी झाले आहेत. गोळीबार करणाऱ्या विद्यार्थ्याची ओळख पटली असून निकोलस क्रूझ (वय १९) असे त्याचे नाव आहे. तो शाळेचा माजी विद्यार्थी असून शाळेतून त्याला काढण्यात आले होते.

स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित निकोलसने प्रथम फायर अलार्म वाजवला, त्यामुळे शाळेत एकच गोंधळ उडाला. सर्वजण जीव वाचवण्यासाठी सैरावरा धावू लागले. त्याचवेळी निकोलसने अचानक अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरूवात केली. या गोळीबारात किमान १७ ठार तर २० हून अधिक जण जखमी झाले. गोळीबारामुळे विद्यार्थी घाबरले होते. अनेक मुले जीव वाचवण्यासाठी शाळेतील वर्गांमध्ये लपून बसले. पोलिसांनी हल्लेखोर निकोलसला ताब्यात घेतले आहे. अमेरिकेत शाळांमध्ये गोळीबार केली जाण्याची ही पहिलीच घटना नाही. काही दिवसांपूर्वीच एका शाळेत विद्यार्थ्याने केलेल्या गोळीबारातही काही विद्यार्थी दगावले होते. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या घटनेप्रकरणी दु:ख व्यक्त केले असून माझ्या संवेदना फ्लोरिडा दुर्घटनेतील पीडितांबरोबर आहेत, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे. ही घटना पार्कलँडमधील मार्जर स्टोनमॅन डगलस हायस्कूलमध्ये घडली.

ब्रोवार्ड कंट्री स्कूलच्या प्रमुख रॉबर्ट रून्सी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, इथे अनेक लोक मारले गेले आहेत. इथे खूप भीतीदायक स्थिती आहे. १९ वर्षांचा बंदुकधाऱ्या युवकाने अचानक गोळीबार केला. त्याने स्वत:हून आत्मसमर्पण केले. या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तत्पूर्वी, शेरिफ स्कॉट इजराईल यांनी संशयित आरोपी शाळेचा माजी विद्यार्थी निकोलसबाबत संपूर्ण माहिती दिली. पूर्वी तो शिळेत शिकत होता. पण त्याने शाळा कधी सोडली याबाबत माहिती नाही. या सर्व प्रकारामुळे अमेरीकेत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments