Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeविदेशफेसबूकवरच्या प्रत्येक लाईकसाठी पतीने अशी केली मारहाण

फेसबूकवरच्या प्रत्येक लाईकसाठी पतीने अशी केली मारहाण

पराग्वे : फेसबुकवर नियमित फोटो अपलोड करणं एका महिलेला इतकं महाग पडलंय की तिचा चेहरा विद्रुप होऊन ती आता एकही फोटो काढू शकणार नाहीए. हा सगळा कारनामा तिच्या पतीनेच केल्याने त्याला अटकही करण्यात आली आहे. 

डेलिमेलने दिलेल्या वृत्तानुसार, दक्षिण अमेरिकेतील पराग्वेमध्ये हा प्रकार घडला आहे. २१ वर्षीय एडोल्फिना कैमेली ऑर्टिगोजा या महिलेला फेसबुकवर फोटो अपलोड करण्याची भारी हौस होती. तिच्या प्रत्येक फोटोला तिचे फेसबुक फ्रेंड लाईक्सही करायचे. मात्र हीच गोष्टी तिच्या पतीला हेलियानो याला अजिबात पटत नव्हती. आपल्या पत्नीचे फोटो इतर लोक लाईक करतात हे पाहून तिच्या पतीला राग येत असे. यावरून त्यांच्यात अनेक खटकेही उडत. मात्र तरीही एडिल्फिनो हिने आपले फोटो शेअर करणं सोडलं नाही. कालांतराने त्यांच्यातील वाद इतके विकोपाला गेले की, पतीने तिला मारायला सुरुवात केली. तिला मिळणाऱ्या प्रत्येक लाईकसाठी पती तिला लाथाबुक्क्यांनी ठोसे देत असत. तसंच मारण्यासाठी तो वेगवेगळी हत्यारे वापरत असत.

एडोल्फिनाच्या सगळ्या सोशल साईटवर तिचा पती देखरेख ठेवत असत. तिच्या फोटोवर किंवा कोणत्याही पोस्टवर कोणी कमेंट किंवा लाईक केल्यास तिला बेदम मारहाण करत असत. लाईक करणाऱ्या व्यक्तीसोबत आपल्या पत्नीचे संबंध असतील असा विचार करून हा पती तिला मारहाण करत होता. एडोल्फिनाचा संपूर्ण चेहरा विद्रुप झाला आहे. तिच्या नाकावर, तोंडावर, डोळ्यांवर ठोश्यांचे वार स्पष्ट दिसताएत.

एवढचं नाहीतर संपूर्ण शरीरावर लाल व्रण उठले आहेत. ए‌वढं सगळं होऊनही तो तिला मारायचा थांबत नव्हता. तिच्या जुन्या पोस्टलाही कोणी लाईक्स केल्यास तिला मारहाण होत असे. शेवटी त्या पतीच्या वडिलांनीच याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. एडोल्फिनाची अवस्था पाहून पोलिसही चक्रावले. ए‌वढंच नव्हे तर पतीने मारहाण केल्यानंतर पोलिसांनी जेव्हा तिचा फोटो तिला दाखवला तेव्हा ती स्वत: घाबरून गेली होती.

तिच्यावर आता उपचारांची गरज आहे. तिचा चेहरा पूर्वीसारखा होण्याकरता डॉक्टरांनी ऑपरेशनचा सल्ला दिलाय. जर वडिलांनी वेळीच तक्रार केली नसती तर कदाचित तिच्या पतीने तिचा जीवच घेतला असता असं पोलिसांनी सांगितलं आहे. त्यामुळे या विकृत पतीला पोलिसांनी अटक केली असून त्याला ३० वर्षांची कारावासाची शिक्षा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments