Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeविदेशअमेरीकेच्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये जनरल कासिम सुलेमानी ठार

अमेरीकेच्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये जनरल कासिम सुलेमानी ठार

Qasem-Soleimaniबगदाद (इराण) : इराणच्या रिव्हॉल्यूशनरी गार्ड कॉर्प्सचा (IRGC) प्रमुख आणि जनरल कासिम सुलेमानी अमेरिकेच्या हल्ल्यात ठार झाला आहे. अमेरिकेने बगदादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी (3 जानेवारी) सकाळी हल्ला करत सुलेमानीला ठार केलं. त्याच्यावर अमेरिकेने सुलेमानी यांच्यावर अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला केल्याचा आरोप केला आहे.

अलजझीरा या आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकेचा रक्षा विभाग पेंटागनने इराकमध्ये कासिम सुलेमानीला मारल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हा हल्ला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार करण्यात आला. याचा उद्देश इराणकडून भविष्यात होणारे हल्ले रोखण्याचा होता, अशी माहिती पेंटागनने दिली आहे. या हल्ल्यात सुलेमानी यांच्या व्यतिरिक्त इराकी मिलिशिया कमांडर अबू महदी अल-मुहान्दिस देखील मारला गेला आहे.

व्हाईट हाऊसने याबाबत एक ट्विट करत माहिती दिली आहे. यात म्हटलं आहे, की “अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परदेशात तैनात असलेल्या अमेरिकेच्या सैनिकांच्या संरक्षणासाठी निर्देश दिले होते. त्यानुसारच ही निर्णायक कारवाई करुन IRGC चा प्रमुख कासिम सुलेमानीला मारण्यात आलं आहे. अमेरिकेने त्याला परदेशी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं आहे.”

जनरल सुलेमानी इराक आणि आजूबाजूच्या क्षेत्रात अमेरिकेच्या राजदुतांवर हल्ला करण्याचं षडयंत्र रचत होता, असाही आरोप अमेरिकेने केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments