Friday, March 29, 2024
Homeविदेशकाबूलमध्ये गुरुद्वारावर दहशतवादी हल्ला

काबूलमध्ये गुरुद्वारावर दहशतवादी हल्ला

Gunmen attack Sikh temple in Kabul Afghanistanकाबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये गुरुद्वारावर दहशतवादी हल्ला झाल्याने प्रचंड खळबळ माजली आहे. या हल्ल्याच्यावेळी शीख समुदायातील अनेकजण प्रार्थनेसाठी जमले होते. अज्ञात आत्मघाती हल्लेखोरांनी हल्ला केला असल्याचे वृत्त आहे. या हल्ल्चात 11 जण ठार झाले आहेत. ठार झालेल्यांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

अफगाणिस्तानचे देशांतर्गत मंत्रालयाच्या प्रवक्ते तारिक आरियन यांनी सांगितले की, या हल्ल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी परिसरात धाव घेऊन प्रत्युत्तरात कारवाई केली. दहशतवादी हल्ल्यात 11 जण ठार झाले असल्याची माहिती खासदार नरिंद्रसिंग खालसा यांनी दिली. हल्ल्याच्या वेळी आपण गुरुद्वाराजवळ होतो. गोळीबाराचा आवाज झाल्यानंतर आपण तातडीने घटनास्थळी धाव घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. या हल्ल्याची अद्याप कोणीही जबाबदारी घेतली नाही. मात्र नागरिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments