होम विदेश बापाने मुलीला बनवले पत्नी, बाळ होताच दोघांचीही केली हत्या

बापाने मुलीला बनवले पत्नी, बाळ होताच दोघांचीही केली हत्या

42
0

london, murderलंडन: बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक चीड निर्माण करणारी घटना समोर आली. स्वतःच्या मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्तापित करुन तिला पत्नी बनवीले. काही दिवसानंतर तिने बाळाला जन्म दिला. त्यानंतर मुलीपासून दूर जावे लागल्याने त्याने त्या दोघांची हत्या करत स्वतः देखील गोळी घालून जीवन संपवले.

ही घटना न्यू इंग्लंडमधील कनेक्टिकट शहरात घडला. स्टीवन प्लाड्ल असे त्या बापाचे नाव आहे. याने आपली मुलगी केटी प्लाड्लसोबत शारीरिक संबंध प्रस्तापित केले. त्याच्या काही दिवसानंतर त्याने आपल्या मुलीला पत्नी करुन घेतले आणि दोघे नवरा-बायको सारखे राहू लागले. केटीने काही काळानंतर एका बाळाला जन्म दिला. केटी आणि स्टीवन यांचे प्रकरण मागच्या फेब्रुवारीमध्ये चर्चेत आले होते. केटीच्या जन्मानंतर तिला एंथोनी फ्यूस्को याने दत्तक घेतले होते. ती मोठी झाल्यानंतर तिने आपल्या जैविक वडिलांना शोधायला सुरुवात केली. त्यामध्ये तिला स्टीवन भेटला. स्टीवनच्या संपर्कात आल्यानंतर त्यांच्यात जवळीक वाढत गेली आणि बाप-लेकीमध्ये शारीरिक संबंध प्रस्तापित झाले. ज्यामुळे केटी गर्भवती राहिली. ही घटना केटीच्या आईला समजताच तिने स्टीवनसोबत भांडणे केली. हे प्रकरण पोलिसात गेल्यानंतर त्यांनी तुम्ही यापुढे कधीच भेटायचे नाही, या अटीवर त्यांची सुटका केली. केटीपासून दूर झाल्यामुळे नाराज झालेल्या स्टीवनने केटीला आणि तिला दत्तक घेतलेल्या व्यक्तीची हत्या केली. त्यासोबतच त्याने तिच्या ७ महिन्याच्या बाळाची देखील हत्या केली. त्यानंतर त्याने स्वतः देखील गोळी घालून आत्महत्या केली.