होम विदेश अमेरिकी लष्कराचं विमान कोसळलं, ९ ठार

अमेरिकी लष्कराचं विमान कोसळलं, ९ ठार

11
0
शेयर

US, Military Plance Crashजॉर्जिया: अमेरिकेमध्ये ९ जणांना घेऊन जाणा-या लष्कराचं एक मालवाहू विमान क्रॅश झाल्याचं वृत्त आहे. सी-130 ‘हर्क्यूलसहे मालवाहू विमान बुधवारी २ मे रोजी सवान्ना विमानतळाजवळील रस्त्यावर आंतरराष्ट्रीय वेळेनुसार जवळपास रात्री ९ वाजता अपघातग्रस्त झालं. यामध्ये विमानातील ९ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विमान जॉर्जियाहून अॅरिझोनाच्या टस्कन येथे जात होतं. हे विमान जवळपास ५० वर्ष जुनं होतं अशी माहिती आहे. ‘प्यूटरे रिको एयर नेशनल गार्ड’चं हे विमान होतं आणि विमानातील सर्व प्यूटरे रिको येथीलच होते अशी माहिती आहे. मृतकांबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. तसंच अपघातामागे नेमकं कारण काय होतं हे अजून स्पष्ट झालेलं नाही.