मोहम्मद अली जिनाच्या कन्या दिना वाडीयांचे अमेरिकेत निधन

- Advertisement -

मुंबई – पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांची कन्या दिना वाडीया यांचे गुरुवारी निधन झाले आहे. त्या ९८ वर्षाच्या होत्या. अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये राहत्या घरी त्यांचे निधन झाले.

दिना यांनी मुंबईमधील पारसी उद्योजक नेविल्ले वाडिया यांच्याशी विवाह केला होता. लग्नानंतर दिना मुंबईत राहिल्या. त्यांना दोन मुले झाली. त्यानंतर त्या वाडियांपासून विभक्त झाल्या. हा विवाह त्यांचे वडील मोहम्मद अली जिना यांना मान्य नव्हता. यामुळे फाळणीनंतर दिना भारतात राहिल्या. वाडिया ग्रुपच्या प्रमुख पारशी उद्योगपती नूस्ली वाडिया यांच्या त्या आई होत्या. नूस्ली वाडिया हे बॉम्बे डाईंग, ब्रिटानिया इंडस्ट्रीज आणि गो एअर यांचे मालक आहेत.

- Advertisement -
- Advertisement -