Thursday, March 28, 2024
Homeविदेशपरवेझ मुशर्रफ यांना मृत्यूदंडाची शिक्षा!

परवेझ मुशर्रफ यांना मृत्यूदंडाची शिक्षा!

Pervez Musharraf, Islamabad High Court, lahore High Court, special court, former president of pakistan, pakistan, death penaltyलाहोर : पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना देशद्रोह प्रकरणी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पाकिस्तानच्या विशेष न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. मुशर्रफ सध्या पाकिस्तानात नाहीत. त्यांच्यावर दुबईत उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीच मुशर्रफ यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करून आरोग्याबाबत माहिती दिली होती. मी कोणत्या परिस्थितीत आहे हे चौकशी आयोगानं येऊन पाहावं, असं ते म्हणाले होते.

लाहोर उच्च न्यायालयाने सरकारला सोमवारी नोटिस पाठवली होती. मुशर्रफ यांनी त्यांची याचिका उच्च न्यायालयात दाखल केल्यानंतर त्यांच्याविरुद्धचा खटला आणि इतर कारवाई असवैधानिक असल्याचं जाहीर करावं अशी मागणी केली होती. त्यावर न्यायालयाने इस्लामाबादच्या विशेष न्यायालायत झालेल्या सुनावणीत हा निर्णय देण्यात आला.

तीन सदस्यीय विशेष न्यायालायत देशद्रोहाचा खटल्याचा निर्णय देण्यात आला. याआधी उच्च न्यायालयाने विशेष न्यायालायला निर्णय देण्यापासून थांबवण्याचे आदेश दिले होते. गेल्या महिन्यात हा निर्णय राखून ठेवला होता.

गेल्या दोन वर्षांपासून मुशर्रफ दुबईत वास्तव्य करत आहे. संविधानाचा भंग केल्या प्रकरणी आणि 2007 मध्ये आणीबाणी लागू केल्या प्रकरणी त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल कऱण्यात आला होता. सध्या 76 वर्षांचे असलेले मुशर्रफ दुबईत उपचार घेत आहेत. तब्येतीचे कारण देत त्यांनी पाकिस्तानात परतण्यास नकार दिला होता.

मुशर्रफ यांनी आणीबाणी लादली होती….

मुशर्रफ यांनी ३ नोव्हेंबर २००७ रोजी देशात आणीबाणी लादली होती. या प्रकरणी त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पाकिस्तानमधील तत्कालीन मुस्लीम लीग नवाज सरकारनं ही कारवाई केली होती. २०१३ पासून हे प्रकरण न्यायप्रविष्ठ होते. डिसेंबर २०१३ मध्ये त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल झाला होता. त्यानंतर ३१ मार्च २०१४ मध्ये मुशर्रफ यांना आरोपी घोषित करण्यात आलं आणि त्याचवर्षी सप्टेंबरमध्ये विशेष न्यायालयात साक्षी नोंदवल्या गेल्या. २८ नोव्हेंबरला निर्णयाला दिली होती स्थगिती दिली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments