Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यापरवेझ मुशर्रफ यांचा मृतदेह तीन दिवस चौकात लटकवून ठेवा

परवेझ मुशर्रफ यांचा मृतदेह तीन दिवस चौकात लटकवून ठेवा

Pervez Musharraf, Islamabad High Court, lahore High Court, special court, former president of pakistan, pakistan, death penaltyइस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना दोन दिवसांपूर्वी देशद्रोहाच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. शिक्षा होण्याआधी मुशर्रफ यांचा मृत्यू झाला तर इस्लामाबादच्या डी-चौकात त्यांचा मृतदेह तीन दिवस लटकवून ठेवण्यात यावा असे निर्देश १६७ पानी निकालपत्रात देण्यात आले आहेत. या प्रकरणात न्यायालयाचे सविस्तर निकालपत्र समोर आले आहे.

या खटल्यात पेशावर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश वकार अहमद सेठ यांच्या नेतृत्वाखाली त्रिसदस्यीय विशेष न्यायालयाने मुशर्रफ यांना मंगळवारी ही शिक्षा सुनावली. न्यायालयाने २ विरुद्ध १ मताने हा निकाल दिला. मुशर्रफ यांनी गुन्हा केलाय यावर न्यायाधीश सेठ आणि करीम यांचे एकमत होते तर न्यायाधीश अकबर यांचे मत विरोधात होते.

फारर असलेल्या दोषी गुन्हेगाराला पकडून आणण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी त्यांच्यापरीने सर्वोत्तम प्रयत्न करावेत व कायद्यानुसार शिक्षेची अंमलबजावणी करावी. शिक्षा होण्याआधी मृत्यू झाला तर मुशर्रफ यांचा मृतदेह इस्लामाबादच्या डी चौकात आणून तीन दिवस फासावर लटकवून ठेवावा” असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.

आकाय हे निकालात…

परवेझ मुशर्रफ यांचा मृतेदह खेचून आणावा व तीन दिवस लटकवून ठेवावा असे निकालपत्राच्या पॅराग्राफ ६६ मध्ये नमूद केले आहे. न्यायाधीश करीम पॅराग्राफ ६६ बरोबर सहमत नाहीत. परवेझ मुशर्रफ यांच्यावर सध्या दुबईमध्ये वैद्यकीय उपचार सुरु आहेत.

आपल्याविरोधातील सर्व आरोप हे राजकीय हेतूने प्रेरित आहेत. या खटल्यातील विशेष बाब म्हणजे आरोपीला आणि त्याच्या वकिलांना आपली बाजू मांडण्याचीच संधी दिली नाही.” असे मुशर्रफ यांनी त्यांच्या व्हिडीओ संदेशात म्हटले आहे.

हे होते प्रकरण….

परवेझ मुशर्रफ यांनी ३ नोव्हेंबर २००७ रोजी देशात आणीबाणी लागू केली होती. यादरम्यान न्यायाधीशांनाही अटक करण्यात आली. या प्रकरणात मुशर्रफ यांच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला. २०१३ मध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर ३१ मार्च २०१४ रोजी आरोपपत्र ठेवण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments