Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeविदेशराणी एलिजाबेथ यांचे पुत्र प्रिन्स चार्ल्स यांना कोरोनाची लागण

राणी एलिजाबेथ यांचे पुत्र प्रिन्स चार्ल्स यांना कोरोनाची लागण

Prince Charles tests positive for novel coronavirusस्कॉटलंड : कोरोनाच्या भूताने ब्रिटनच्या 71 वर्षीय प्रिन्स चार्ल्स यांनाही आपल्या जाळ्यात ओढले आहे. चार्ल्स यांच्यात सौम्य लक्षणं आढळल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय, “मात्र त्यांची प्रकृती उत्तम आहे,” असंही क्लॅरेन्स हाऊसच्या वतीने स्पष्ट करण्यात आलंय. त्यांच्या पत्नी डचेस ऑफ कॉर्नवॉल यांचीही चाचणी घेण्यात आली होती, मात्र त्यांना विषाणूची लागण झालेली नाही.

प्रिन्स चार्ल्स हे “गेल्या काही दिवसांपासून घरूनच काम करत होते” आणि यापुढे ते आणि कॅमिला बॅलमोरल कॅसलमध्ये स्वतःला वेगळे ठेवणार आहेत, असंही क्लॅरेन्स हाऊसने स्पष्ट केलं आहे.

“सरकारच्या आणि आरोग्य तज्ज्ञांच्या सल्ल्यांनुसार प्रिन्स आणि डचेस आता त्यांच्या स्कॉटलंडमधील घरी वेगळे इतरांपासून राहणार आहेत,” असंही पुढे सांगण्यात आलंय. “गेल्या काही आठवड्यांमध्ये त्यांनी अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्यांची भूमिका पार पाडली आहे. त्यामुळे चार्ल्स यांना कुणापासून कोरोना व्हायरसची लागण झाली असावी, हे नेमकं सांगता येणार नाही,” असंही या निवेदनात सांगण्यात आलंय.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments