होम विदेश अफगाणिस्तानात सहा भारतीय कर्मचाऱ्यांचे अपहरण!

अफगाणिस्तानात सहा भारतीय कर्मचाऱ्यांचे अपहरण!

22
0
शेयर

Afghanistan

अफगाणिस्तान: अफगाणिस्तानमध्ये रविवारी सकाळच्या सुमारास बागलान प्रांतात काही अज्ञात बंदुकधाऱ्यांनी एका भारतीय कंपनीच्या सात कर्मचाऱ्यांचे अपहरण केले असून यात सहा कर्मचारी हे भारतीय तर एक जण हा अफगाणिस्तानचा आहे. केईसी असे या भारतीय कंपनीचे नाव आहे.

Six Indians abducted in Afghanistan’s Baghlan, reports TOLO News

अफगाणिस्तानच्या ‘टोलो न्यूज’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, बागलान प्रांताची राजधानी पुल-ए-खोमरेमधील बाग-ए-शामल गावातून या कर्मचाऱ्यांचे अपहरण करण्यात आले आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कर्मचारी प्रवासात असताना ही घटना घडली. या परिसरात भारतीय कंपनीला वीज उपकेंद्राचे काम मिळालेले आहे. बागलान प्रांताने या घटनेमागे तालिबानी दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे म्हटले आहे. परंतु, तालिबानींकडून याबाबत कोणतेही वक्तव्य आलेले नाही. अद्यापपर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने या घटनेची जबाबदारी स्वीकारलेली नाही.