Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeविदेशपेशावरमध्ये कृषी विद्यापीठावर दहशतवादी हल्ला

पेशावरमध्ये कृषी विद्यापीठावर दहशतवादी हल्ला

महत्वाचे…
पेशावर कृषी विद्यापीठात झालेल्या हल्यात ११ ठार २. पाचही दशतवादी ठार ३. बहुतेक विद्यार्थी हॉस्टेलमध्ये नव्हते


पाकिस्तान: पाकिस्तानमधील पेशावर येथे कृषी विद्यापीठातील मुलांच्या हॉस्टेलवर शुक्रवारी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात ११ जणांचा मृत्य़ू झाला असून ३० पेक्षा जास्त जखमी झाले आहेत. पाकिस्तानमधील सुरक्षा दलांनी हल्ला करणाऱ्या पाचही दहशतवाद्यांना ठार मारले. आठवड्याचा शेवट असल्याने बहुसंख्य विद्यार्थी घरी गेले होते, यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

पेशावरमध्ये कृषी विद्यापीठ असून या विद्यापीठाच्या जवळ मुलांचे हॉस्टेल आहे. या हॉस्टेलवर शुक्रवारी पाच आत्मघाती दहशतवाद्यांनी हल्ला केला. गोळीबाराचा आवाज ऐकून काही विद्यार्थ्यांनी हॉस्टेल बाहेर पळ काढला. हल्ल्याचे वृत्त समजताच पोलीस आणि सैन्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. हॉस्टेलमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले. या घटनेत ३० जण जखमी झाले असून यात सुरक्षा दलातील सैनिकांचाही समावेश आहे. ११ जणांचा मृत्यू झाल्याचे स्थानिक प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.

हल्ला करणाऱ्या पाचही दहशतवाद्यांना ठार मारले असून तालिबानी दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याचा संशय आहे. ‘आठवड्याच्या शेवटी लागोपाठ सुट्टी आल्याने अनेक विद्यार्थी घरी गेले होते आणि त्यामुळे अनर्थ टळला’, अशी माहिती या भागातील पोलीस महानिरीक्षक सलाहउद्दीन महसूद यांनी दिली. ‘मी सकाळी झोपलो होतो, तेवढ्यात मला गोळीबाराचा आवाज आला. मी आणि माझा एक मित्र सैरावैरा पळत होतो. शेवटी आम्हाला बाहेर जाण्याचा मार्ग सापडला, असे हॉस्टेलमधून सुटका झालेल्या विद्यार्थ्याने सांगितले. दहशतवादी रिक्षेतून हॉस्टेलपर्यंत आले. सुरक्षा दलांना चकवा देण्यासाठी ते बुरखा घालून आले होते, असे समजते.  पेशावरमध्ये आठवडाभरातील हा दुसरा हल्ला आहे. यापूर्वी पोलीस मुख्यालयाजवळ झालेल्या हल्ल्यात पोलीस अधिकारी शहीद झाला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments