Friday, March 29, 2024
Homeविदेशकुलभूषणशी आई आणि पत्नीने पाकच्या परराष्ट्र मंत्रालयात घेतली भेट

कुलभूषणशी आई आणि पत्नीने पाकच्या परराष्ट्र मंत्रालयात घेतली भेट

ANI

इस्लामाबाद – हेरगिरीच्या आरोपाखाली पाकमध्ये बंदिस्त असलेले कुलभूषण जाधव यांची त्यांच्या आई आणि पत्नीने भेट घेतली. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयात त्या दोघींनी कुलभूषण यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावेळी त्यांच्यासोबत उच्चायुक्तालयातील उपायुक्त जे. पी. सिंग यांची उपस्थिती होती.

कुलभूषण जाधव यांच्या  पत्नी व आई आज जाधव यांची भेट घेण्यासाठी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयात दाखल झाल्या होत्या. यावेळी त्यांनी भारतीय उच्चायुक्तालयातील उपायुक्त जे. पी. सिंग यांची भेट घेतली. या भेटीच्या पार्श्वभूमीवर पाकच्या परराष्ट्र मुख्यालय परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. या परिसरात प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments