अनोखा बाजार! चक्क सुंदर ‘पत्नी’च्या खरेदीसाठी येतात तरुण

- Advertisement -

 

खरं तर आपण बाजारात काही गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी जातो. मात्र, काय तुम्ही हा विचार करू शकता की बाजारात नवरी सुद्धा खरेदी करता येते. होय, तीन वर्षातून एकदा बुल्गारियातील स्टारा जागोर नावाच्या ठिकाणी नवरींचा बाजार भरतो. येथे तरूण मुलगा येऊन आपल्या मनपसंत मुलीला खरेदी करून आपली पत्नी बनवू शकतो. हा मेळावा, बाजार अशा गरीब लोकांकडून लावलो जातो ज्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही ते आपल्या मुलीचे लग्न लावून देतात.

- Advertisement -

नवरीच्या आई-वडिलांना द्यावे लागतात पैसे…

– तरूणींना म्हणजे नवरी मुलीला चांगल्या कपड्यात नटवून बसविले जाते.
– विकल्या जाणा-या नवरीत सर्व वयोगटातील तरूणी महिला असतात.
– नवरी खरेदी करण्यासाठी तरूणासोबत त्याचे आई-वडिलही येतात.
– नवरा मुलगा प्रथम आपल्याला आवडेल अशी मुलगी शोधतो. त्यानंतर बोलणी चालणी होतात.
– नवरी पसंत आल्यानंतर तो आपल्या आई-वडिलांना सांगतो मग दोन्ही वर-वधूचे पालक खरेदीची रक्कम ठरतात.
– नवरी खरेदीचा हा प्रकार बुल्गारियात गरीब लोकांत परंपरेने चालत आहे. त्याला कोणताही कायदा रोखू शकत नाही.

नियमाचे होते काटेकोरपणे पालन
– ही प्रथा गरीब लोकांची आर्थिक स्थिती ध्यानात घेऊन सुरु केली होती.
– बाजारात असेच लोक येतात ज्यांची मुलीचे लग्न करण्याची आर्थिक कुवत नसते.
– बाजारात नवरी मुलगी एकटी येत नाही. तिच्यासमवेत परिवारातील सदस्य असणे आवश्यक असते.
– आपल्याकडे नवऱ्या मुलाला हुंडा दिला जातो. मात्र तेथे याच्या उलट प्रथा आहे. येथे मुलाच्या पालकांना मुलीच्या पालकांना पैसे द्यावे लागतात.
– यामुळे गरीबांना आर्थिक मदतही होते. हे गृहित धरूनच कायदा त्याला परवानगी देतो. तसेय याचे काटेकोरपणे पालन केले जाते.
– हा बाजार बुल्गारियातील कलाइदझी समुदायाद्वारे लावला जातो. या समुदायातील मुलीशिवाय बाहेरील व्यक्ती नवरी म्हणून स्वीकारली जात नाही.

- Advertisement -