Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeविदेशचक्क विमानात तरुणीने सुकायला टाकले अंतर्वस्त्र!

चक्क विमानात तरुणीने सुकायला टाकले अंतर्वस्त्र!

महत्वाचे…

  • महिला प्रवासी आपलं अंतर्वस्त्र काढून सुकवत आहे
  • विमान टर्कीमधील अंटाल्या येथून मॉस्कोच्या दिशेने प्रवास करत होतं
  • तरुणीचा विमानातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल

मॉस्को – विमानाचा प्रवासही आता अनेक गंमतीशीर आणि चीड निर्माण करणाऱ्या गोष्टींनी चर्चेचा विषय बनला आहे. कधी भांडण तर कधी कोणी अश्लील कृत्य करत असतं, पण सध्या एका तरुणीचा विमानातील व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती विचित्रपणे वागत आहे. प्रवाशांनी भरलेल्या विमानात ही महिला प्रवासी आपलं अंतर्वस्त्र काढून सुकवत आहे. तरुणीचं हे वागणं पाहून इतर प्रवासी मात्र आश्चर्यचकित झाले होते. तरुणीचा विमानातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

रशियामधील उरल एअरलाइन्समध्ये हा प्रकार घडला आहे. हे विमान टर्कीमधील अंटाल्या येथून रशियाची राजधानी मॉस्कोच्या दिशेने प्रवास करत होतं. यावेळी विमानात अचानक एक तरुणी आपलं अंतर्वस्त्र डोक्यावर असलेल्या एसीजवळ नेऊन सुकवण्याचा प्रयत्न करु लागली. जवळपास एक मिनिटाच्या व्हिडीओत तरुणी हे करत असल्याचं दिसत आहे. विमानातच प्रवास करणा-या एका प्रवाशाने यावेळी तरुणीचा व्हिडीओ शूट केला. सध्या हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments