Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeआरोग्यरोज एक केळं खा आणि मिळवा हे 'आठ' फायदे

रोज एक केळं खा आणि मिळवा हे ‘आठ’ फायदे

फळे आरोग्यास लाभदायी असतात, हे आपण सर्वच जाणतो. पण कोणत्या फळाचे नेमके काय फायदे आहेत, याबद्दल फारशी माहिती आपल्याला नसते. त्यात जर केळं म्हटलं तर त्याबद्दलचे अनेक गैरसमज आपल्याकडे रूढ आहेत. केळ्यामुळे वजन वाढते, जाड होतो, असे अनेक. पण केळं अनेक प्रकारे फायदेशीर आहे. जाणून घेऊया केळ्याचे आरोग्यास होणारे फायदे.

तणाव होईल दूर

संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की, केळ्याचे सेवन केल्याने ताण-तणाव कमी होण्यास मदत होते. उदास प्रवृत्ती दूर होते. त्याचबरोबर केळ्यातील व्हिटॉमिन बी मुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी सुरळीत राहते.

अॅनेमियावर फायदेशीर

अॅनेमिया म्हणजे शऱीरात हिमोग्लोबीनची कमी. तुम्हाला जर अॅनेमिया असेल तर केळं अवश्य खा. शरीरात आर्यनची कमी हळूहळू भरून निघेल आणि अॅनेमियाची समस्या दूर होण्यास मदत होईल.

बद्धकोष्ठता दूर होण्यास

केळ्यामुळे बद्धकोष्ठतेच्या त्रासावर आराम मिळतो. रात्री झोपताना दूधासोबत केळे खाल्यास गॅस, बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होण्यास मदत होईल.

ताकद वाढवण्यासाठी

केळ्यामुळे शक्ती मिळते. रोज दूधासोबत एक केळे खाल्यास काही दिवसाताच शरीर धष्ट पुष्ट होईल.

कोरड्या खोकल्यावर आराम 

कोरडा खोकला असल्यास केळ्याचं ज्यूस पिणे फायदेशीर ठरेल. केळ्याचे काप करून त्यात दूध आणि वेलची घालून ज्यूस बनवा आणि प्या.

पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी

केळ्यात असलेल्या फायबर्समुळे पचनक्रिया सुरळीत होते. पचनक्रिया सुरळीत असेल तर तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहता.

जुलाबावर फायदेशीर

जुलाब सुरू झाल्यास केळं फेटून त्यात साखर घालून दिवसातून दोन ते तीन वेळा घ्या. नक्कीच फरक जाणवेल.

रक्त पातळ करण्यासाठी

केळं खाल्याने रक्तवाहिन्यातील रक्त पातळ होण्यास मदत होते. त्यामुळे शरीरातील रक्तसंचार सुधारतो. केळ्यात असलेल्या मॅग्नेशियममुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments