Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeआरोग्यसीताफळ पित्तनाशक आहे, वातदोषही कमी करते

सीताफळ पित्तनाशक आहे, वातदोषही कमी करते

Custard Apple Sitafal Sitaphal,Sitafal,Sitaphal,Apple,Custard,Custard Appleबाजारात सीताफळे मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. हंगामी काळात ते फळ खाल्ल्याने आरोग्यासाठी फायदेशीर असते. सीताफळ हे अतिशय उपयुक्त असे फळ आहे. सीताफळ खाण्यासाठी जितके स्वादिष्ट लागते तितकेच ते आरोग्यासाठी उत्तम असते. सीताफळ हे पित्तनाशक, पौष्टिक, रक्तवर्धक, वातदोष कमी करणारे, दम्याचा त्रास कमी करणारे फळ आहे.

काही जणांना पिकलेल्या सीताफळाचा गर खायला आवडतो तर काही जणांना त्याच्यापासून तयार केलेले मिल्कशेक आणि बासुंदी, तर जाणून घ्या सीताफळ आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे.

हृदयरोगापासून बचाव…

आजकालच्या दगदगीच्या जीवनशैलीमुळे ह्रदयावरील ताण दिवसेंदिवस वाढत चालला आहे. काम आणि चिंता यामुळे ह्रदयाचे आरोग्य बिघडण्याची शक्यता अधिक असते. ह्रदयाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी ह्रदयातील मांसपेशींना मॅग्नेशियमची गरज असते. सीताफळात भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम असते. ज्यामुळे ह्रदयविकारापासून दूर राहण्यासाठी सीताफळ खाणे तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकते.

अशक्तपणा कमी होतो…

आजकाल योग्य पोषण न झाल्यामुळे आणि रक्ताचे प्रमाण कमी असल्यास अॅनिमियाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. ज्यामुळे सतत थकवा आणि चक्कर अशी लक्षणे जाणवतात. पुरुषांपेक्षा महिलांना या समस्येचा त्रास अधिक होत असते. मात्र सीताफळात लोह भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे सीताफळ खाण्यामुळे शरीरातील लोहची कमतरता भरून निघू शकते.

दम्याचा त्रास कमी होतो…

ज्यांना अस्थमा अथवा दम्याचा त्रास असेल त्यांनी सीताफळ खाल्ल्यास चांगला फायदा होऊ शकतो. सीताफळमधील व्हिटॅमिन बी 6 श्वसनमार्गातील सूज कमी करण्यास मदत करते. ज्यामुळे इनफेक्शनचा त्रास कमी होतो आणि दम्यापासून नक्कीच आराम मिळू शकतो.

गर्भधारणेसाठी वरदान…

गर्भधारणेत अपयश आल्यामुळे अनेक जोडप्यांचे आई-बाबा होण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. वास्तविक गर्भधारणेसाठी स्त्रीच्या शरीराला फॉलिक अॅसिडची गरज असते. जर फेलोपियन ट्यूबमध्ये दोष असतील तर ते फॉलिक अॅसिडमुळे कमी होतात. सीताफळात भरपूर प्रमाणात फॉलिक अॅसिड असते. ज्यामुळे गर्भधारणेच्या प्रक्रियेला नक्कीच चालना मिळू शकते. यासाठी आई होण्यासाठी प्रयत्न करत असाल तर सीताफळ खायला काहीच हरकत नाही. मात्र लक्षात ठेवा गर्भधारणेनंतर अती प्रमाणात सीताफळ खाल्ल्यास गर्भपाताचा त्रास होण्याची शक्यता असते.

सुंदर दिसण्यासाठी खा…

सीताफळामुळे त्वचेचे आरोग्य चांगले राहू शकते. कारण सीताफळात व्हिटॅमिन ए आणि अँटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे त्वचेच्या पेशींचे कार्य सुरळीत चालते आणि त्वचा चमकदार आणि फ्रेश दिसते. शिवाय नियमित सीताफळ खाण्यामुळे चेहऱ्यावरील एजिंगच्या खुणा कमी प्रमाणात दिसतात. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments