Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeआरोग्यपायाला मसाज करण्याचे फायदे

पायाला मसाज करण्याचे फायदे

Benefits of massaging the foot
दिवसभराच्या धावपळीनंतर शारीरिक मरगळ कमी करण्यासाठी ‘स्पा’ सेंटर किंवा मसाज पार्लरमध्ये जाऊन पैसा खर्च करून मसाज केली जाते. त्यामुळे वेळखाऊ आणी खर्चिक अपॉइंटमेंट्स घेण्याआधी आयुर्वेदाने दिलेल्या ‘पादाभ्यंग’ या सहज सोप्या आणि घरच्या घरीही करणे शक्य असलेल्या प्रभावी उपचार पद्धतीबाबत आहेत.

पूर्वी लग्नाच्या आहेरात दिल्या जाणाऱ्या काशाच्या ( glass-bowl ) वाटीमागे आरोग्यदायी संकेत दडला आहे. पादाभ्यांग, पायाला मसाज करताना काशाच्या वाटीचा कशा प्रकारे वापर करावा त्याचे काय आहेत आरोग्यदायी फायदे…

काशाची वाटी म्हणजे काय ?

1. कांस्य हा मिश्र धातू तांबे आणि जस्तमिश्रित असतो. त्यापासून तयार केलेल्या वाटीने पायाला मसाज केल्यास शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते. सोन्यापेक्षा स्वस्त आणि सामान्यांच्या आवाक्यात असलेल्या कांस्य या धातूपासून काशाची वाटी बनवली जाते.

2. शरीरात वाढलेली अतिरिक्त उष्णता आणि वात कमी करण्यासाठी काशाची वाटी प्रभावी ठरते. पायाला तेल, तूप लावून मसाज करण्याच्या प्रक्रियेला, उपचार पद्धतीला पादाभ्यंग म्हणतात.

3. आबालवृद्धांनी नियमित पायाला मसाज करणे आवश्यक आहे. कारण आयुर्वेदानुसार डोके, कान आणि पाय या तीन अवयवांमध्ये वात वाढण्याची शक्यता अधिक असते. वेळीच त्याचा निचरा न झाल्यास शरीरात काही दोष, आजार वाढण्याची शक्यता बळावते.

4. काशाच्या वाटीने पायाला मसाज केल्याने वात कमी होण्यासोबतच पायाच्या तळव्याला भेगा पडणे, पायात आग / जळजळ जाणवणे अशा समस्या कमी होतात.

5. शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्यांच्या जाळ्यांचे एक टोक पायापाशी असल्याने तेथे मसाज केल्यानंतर शरीरातील थकवा कमी होण्यास मदत होते. शरीरात थंडावा वाढतो.

6. डोळ्यांचे आरोग्य पायांवर अवलंबून असल्याने डोळ्यांच्या स्नायूंना तेथील नसांना चालना मिळण्यासाठी पायाला मसाज करणे फायदेशीर ठरते.

7. त्वचेतील शुष्कता कमी होऊन मुलायमपणा वाढतो. पायांना मसाज केल्याने निद्रानाशाची समस्या आटोक्यात राहते.

तेल किंवा तुपाचा वापर करणे आवश्यक…

काशाच्या वाटीने पायाला मसाज करताना तेल किंवा तुपाचा वापर करणे आवश्यक आहे. तुपाऐवजी पायाला मसाज करताना कोमट तिळाच्या तेलाचा किंवा खोबरेल तेलाचाही वापर करू शकता. पायाला पडलेल्या भेगा भरण्यासाठी भिंडेल किंवा कोकमचे तेल फायदेशीर ठरते.

रात्री झोपण्यापूर्वी पायाला मसाज करणे फायदयाचे…

रात्री झोपण्यापूर्वी पायाला मसाज केल्यास शरीरात थंडावा निर्माण होऊन शांत झोप मिळण्यास मदत होते. यासोबतच सकाळी अंघोळीपूर्वी अर्धा तासदेखील मसाज करणे फायदेशीर ठरते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments