Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeआरोग्यमुलांमध्ये व्हिटॅमिन 'डी' च्या कमतरतेमुळे वाढू शकतो रक्तदाब

मुलांमध्ये व्हिटॅमिन ‘डी’ च्या कमतरतेमुळे वाढू शकतो रक्तदाब

Vitamin Dजीवनात उच्च किंवा कमी रक्तदाबाचा त्रास वाढत चालला आहे. अनेक वेळा व्हिटॅमिन ‘डी’च्या कमतरतेमुळे देखील लहान मुलांमध्ये रक्तदाबाचा धोका वाढतो. एका अभ्यासानुसार, जन्माच्या वेळी किंवा गर्भावस्थेत असताना, जर मुलांना व्हिटॅमिन डी मिळाले नाही, तर मुलांमध्ये उच्च रक्तदाबाचा धोका वाढू शकतो.

कॅल्शियम तयार होण्यासाठी व्हिटॅमिन डी महत्त्वाचे :
हाडे मजबूत ठेवण्यासाठी हाडात कॅल्शियम तयार होणे गरजेचे असते. हाडात दोन प्रकारे कॅल्शियम तयार होत असतात, एक सकाळचा सूर्यप्रकाश अंगावर पडल्यावर व्हिटॅमिन ‘डी’ तयार होते, व्हिटॅमिन ‘डी’ची मदत हाडात कॅल्शियम तयार होण्यास होते आणि दुसऱ्या प्रकारे आपल्या शरीरातून तयार होणारे कॅल्शियम.

उच्च रक्तदाबाचा त्रास ६० टक्क्यांनी वाढतोय :
एका अभ्यासात हे दिसून आले आहे की, गर्भावस्थेत किंवा लहानपणी जर योग्य प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळाले नाही, तर वयाच्या ६ ते १८ वर्षंापर्यंतच्या मुलांमध्ये हाय सिस्टोलिक उच्च रक्तदाबाचा त्रास ६० टक्के लोकांमध्ये वाढतो. हा निष्कर्ष संशोधकांनी बॉस्टन मेडिकल सेंटरमध्ये काढला. यासाठी १८ वर्षांपर्यंतच्या ७७५ मुलांचे निरीक्षण करण्यात आले. उच्च रक्तदाब म्हणजे हा एक असा त्रास आहे, जो आजकाल अनेकांना होत आहे. रक्तदाब वाढल्याने रक्त वाहून नेणाऱ्या धमन्यांमधील रक्ताच्या प्रवाहाचा वेग वाढतो. यामुळे हृदयाला त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त काम करावे लागते.

उच्च रक्तदाब नियंत्रणात आणणारी फळे ज्या भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम आहेत, अशा भाज्यांचा आहारात समावेश करा. कारण र पोटॅशियम उच्च रक्तदाब कमी करू शकतो. खालील फळे खाल्ल्यास तुमचा रक्तदाब निश्चितच नियंत्रणात राहणार आहे.

स्वीट पोटॅटो म्हणजेच रताळं. यात कॅरोटीन, कॅल्शियमसारखे फायबर्स असतात. जे तणाव कमी करतात आणि रक्तदाबदेखील नियंत्रणात आणतात.

जास्त तळलेेले, चिकट, तेलकट पदार्थ जेवणात किंवा खाण्यात आल्याने, तसेच शारीरिक श्रम कमी होत असल्यास उच्च रक्तदाबाचा त्रास वाढत जातो. आहारतज्ञांच्या मते ज्या फळे तसेच पालेभाज्यांचा समावेश आहारात केल्यास रक्तदाबाचा त्रास कमी होऊ शकतो किंवा दूर होऊ शकतो.

केळी पोटॅशियमचा सर्वात चांगला स्रोत आहे. उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी, भरपूर अॅटिंऑक्सिडंट, व्हिटॅमिन सी, ओमेगा ३ फॅट्टी अॅसिडची गरज असते आणि ते रताळ्यात असते. यामुळे सर्वांनीच काळजी घेणे गरजेचे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments