Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeआरोग्यमधुमेहींना अंड्याचे सेवन फायदेशीर

मधुमेहींना अंड्याचे सेवन फायदेशीर

मधुमेहाचा झाल्यानंतर खाणपानावर बरीच बंधन येतात. मधुमेहींनी कोणते पदार्थ खावेत? किती प्रमाणात खावेत यावर रक्तातील साखरेची पातळी अवलंबून असते. अनेकांना मधुमेहींनी अंड खाऊ नये असे वाटते. पण नव्या संशोधनानुसार, मधुमेहींनी आहारात अंड्याचा समावेश करणं फायदेशीर ठरू शकतं. 

अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्युट्रिशनने दिलेल्या अहवालानुसार अंड्यामुळे रक्तातील कोलेस्ट्रेरॉलच्या प्रमाणावर परिणाम होत नाही. आठवड्याभरात १२ अंडी खाल्ल्याने मधुमेहाचे प्री डायबेटीक आणि टाईप २ च्या रूग्णामध्ये हृद्याचे आजार जडण्याचा धोका कमी होतो. अंड्यामध्ये कोलेस्ट्रेरॉलचे प्रमाण अधिक असते त्यामुळे  शरीरात कोलेस्टेरॉल वाढेल या भीतीने अंड कमी खावे असा सल्ला दिला जातो. सिडनी युनिव्हरसिटीच्या निकोलस फुलरच्या म्हणण्यानुसार, मधुमेहींनी अंड खावे का? याबाबत मतभेद असले तरीही त्याचा आहारात योग्य प्रमाणात समावेश केल्यास कोणताही धोका नाही.

 अंड ठरते फायदेशीर?

अंड्यातील प्रोटीन आणि इतर पोषक घटक आरोग्याला फायदेशीर ठरतात. आहारात अंड्याचा समावेश केल्यास डोळ्यांचे आरोग्य सुधारते. हृद्याचे आरोग्य उत्तम राहते. रक्त वाहिन्यांनादेखील मजबूत करण्यास मदत करतात. गरोदर स्त्रीयांनादेखील अंड खाण्याचा सल्ला दिला जातो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments