Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeआरोग्यघरगुती उपायातून पायाची काळवंडलेली त्वचा दूर करा!

घरगुती उपायातून पायाची काळवंडलेली त्वचा दूर करा!

Nailsसौंदर्य टिकवण्यासाठी वाट्टेल ते प्रयोग आपण करुन बघतो. फक्त चेहऱ्यापुरतं मर्यादीत राहिलेलं नाही. आजकाल सौंदर्याच्या बाबतीत मुली लहान सहान गोष्टींना ही महत्त्व देऊ लागल्या आहेत. केसांपासून ते अगदी पायांच्या बोटांपर्यंत सगळ्याची काळजी घेण्याकडे त्यांचा भर आहे. हात-पायांची बोटं, नखं सुंदर ठेवण्यासाठी सगळेच प्रयत्न करतात. सुंदर, नितळ, स्वच्छ बोटं आणि नखं सगळ्यांनाच हवीशी असतात. म्हणून बोटांजवळील काळसर भाग, नखांजवळील मृत त्वचा दूर काही परिणामकारक टीप्स…

नखांजवळील काळवंडलेली त्वचा दूर करण्यासाठी:

मॅनिक्युअर

बोटं व नखं स्वच्छ, सुंदर दिसण्यासाठी मॅनिक्युअर करणे हा उत्तम उपाय आहे. त्यामुळे नखांजवळील मृत त्वचा दूर होते. रक्तप्रवाह सुधारतो. परिणामी त्वचा नितळ व टवटवीत दिसू लागते. तसेच मॅनिक्युअर केल्यानंतर काहीसे रिलॅक्स वाटते.

डार्क कुटिकल्स साठी घरगुती उपाय:

मिल्क क्रीम स्क्रब

दूध हे नैसर्गिक माईश्चरायझर आहे. तसेच त्यामुळे त्वचेचे पोषण होते. स्क्रब बनवण्यासाठी वाटीभर ओट्स घ्या. त्यात दुधाची साय घाला. मग मध आणि लिंबाच्या रसाचे काही थेंब घालून नीट मिक्स करा. तुमचे स्क्रब तयार झाले. आता बोट-नखांजवळील काळवंडलेल्या त्वचेवर लावा आणि फरक पहा.

लिंबू

अर्ध्या कापलेल्या लिंबावर साखर घाला आणि त्वचेच्या काळसर भागावर चोळा. लिंबामुळे त्वचा स्वच्छ होईल. हा उपाय नियमित केल्यास हळूहळू त्वचा उजळू लागेल. तसंच साखरेमुळे त्वचा मॉईश्चराइज होईल.

नैसर्गिक ब्लीच- ताक

काळवंडलेली त्वचा दूर करण्यासाठी ताक हा उत्तम उपाय आहे. एका भांड्यात चमचाभर calamine आणि चंदन पावडर घ्या. त्यात थोडे ताक आणि केशराच्या काही काड्या घाला. काही वेळ ते मिश्रण कोरडे होऊ द्या. मग आवश्यक तिथे हा पॅक लावून २० मिनिटांनंतर धुवा.

हेल्दी पदार्थांचा आहारात समावेश:

व्हिटॅमिन बी६ आणि बी१२ ची कमतरता हे नखांजवळील त्वचा काळवंडण्याचं प्रमुख कारण आहे. दूध, केळ, अक्रोड, पालक, तीळ, नासपती, चीज, मनुका तसंच अंडी, चिकन, रावस, कोलंबी यांसारख्या बी६ आणि बी१२ युक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. त्यामुळे काळवंडलेली त्वचा दूर होण्यास मदत होईल आणि तुम्हाला  नितळ, चमकदार त्वचेचा अनुभव घेता येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments