Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeआरोग्यया कारणांमुळे हातापायांना मुंग्या येतात!

या कारणांमुळे हातापायांना मुंग्या येतात!

Numb handsखूप वेळ बसल्यास किंवा एकाच स्थितीत बराच वेळ झोपल्यामुळे पाय किंवा हात सुन्न होतात, त्यांना मुंग्या येतात. परंतु, हा त्रास तुम्हाला वारंवार होत असेल तर हे कोणत्यातरी त्रासाचे लक्षण आहे. पण हाता पायांना मुंग्या का येतात, याचे कारण तुम्हाला माहित आहे का? तर त्यासाठी ही ५ कारणे जबाबदार ठरतात या बाबत जाणून घेऊ या…

व्हिटॅमिनची कमतरता

जर तुमच्या हात व पाय दोघांना ही मुंग्या येत असतील तर तुमच्यात व्हिटॅमिन बी १२ची कमतरता आहे. तसंच त्यामुळे तुम्हाला थकलेले किंवा आळसवाणे वाटेल.

फिजिओथेरपी, व्यायामाने करा दूर

खूप वेळ टायपिंग केल्याने तुमच्या मनगटाच्या नसा आकुंचित होतात व त्यामुळे हाताला मुंग्या येतात. फिजिओथेरपी आणि व्यायामाने Carpal tunnel syndrome चा त्रास दूर होण्यास मदत होईल.

मानेची नस आखडणे

मानेची नस आखडली गेल्यास पाठीपासून पायापर्यंत किंवा मानेपासून हातापर्यंतच्या भागात मुंग्या येतात किंवा तो भाग दुखतो. चुकीच्या पद्धतीत बसल्यामुळे किंवा एखाद्या दुखापतीमुळे मानेची नस आखडली जाते.

मधुमेह

रक्तातील साखरेचे अतिरिक्त प्रमाण शरीरातील नसांसाठी विषारी ठरते व त्यामुळे हातापायांना मुंग्या येतात. मुंग्या येण्याबरोबरच तुम्हाला खूप भूक किंवा तहान लागत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

हायपरथायरॉईसम

थायरॉईड ग्रंथी निष्क्रीय असल्यास थकवा जाणवू लागतो, वजन वाढू लागते. त्याचबरोबर हातपायाला मुंग्या येतात. म्हणून हायपरथायरॉईसम आहे की नाही हे पाहण्यासाठी ब्लड टेस्ट करून घेणे योग्य ठरेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments