Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeदेशत्रिपुरा, मेघालय, नागालँडमध्ये फेब्रुवारीत मतदान

त्रिपुरा, मेघालय, नागालँडमध्ये फेब्रुवारीत मतदान

नवी दिल्ली:  त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा घोषित करण्यात आल्या आहेत. त्रिपुरामध्ये १८ फेब्रुवारी रोजी तर नागालँड आणि मेघालयात २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून या तिन्ही राज्यांमधील मतमोजणी ३ मार्च रोजी होणार असल्याची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त ए. के. ज्योती यांनी केली.

मुख्य निवडणूक आयुक्त ए. के. ज्योती यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन या तिन्ही राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला. या तिन्ही राज्यांतील विधानसभेची सदस्यसंख्या प्रत्येकी ६०-६० आहे. नागालँडच्या विधानसभेचा कार्यकाळ १३ मार्च रोजी, मेघालयाच्या विधानसभेचा ६ मार्च रोजी आणि त्रिपुरा विधानसभेचा कार्यकाळ १४ मार्च रोजी संपुष्टात येत आहे.

कोणत्या राज्यात कोणाची सत्ता

मेघालय – काँग्रेस

त्रिपुरा – माकप

नागालँड – नागा पिपल्स फ्रंट ( फ्रंटला भाजनं पाठिंबा दिलेला आहे)

त्रिपुरातील पक्षीय बलाबल ( एकूण जागा ६६ )

सीपीएम आघाडी – ५१

भाजप – ७

काँग्रेस – २

मेघालयातील बलाबल ( एकूण जागा ६६ )

काँग्रेस- २४

यूडीपी – २

एचएसपीडीपी – ४

भाजप – २

एनसीपी- २

एनपीपी – २

एनईएसडीपी – १

अपक्ष – ९

रिक्त जागा – ९

नागालँडमधील पक्षीय स्थिती ( एकूण जागा ६६ )

एनपीएफ – ४५

भाजप – ४

जेडीयू -१
एनसीपी – १

अपक्ष – ८

रिक्त जागा- १

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments