भ्रष्टाचार ,काळापैसा विरोधी लढाई जिंकल्याबद्दल भारतीयांचं अभिनंदन-पंतप्रधान

- Advertisement -

दिल्ली: आज नोटबंदीला एक वर्ष पूर्ण झालं.या निमित्त साऱ्या देशातून विरोधक या गोष्टीचा विरोध करत असतानाच पंतप्रधानांनी मात्र जनतेचं अभिनंदन केलंय.

आज सकाळी पंतप्रधानांनी ट्विट केलं. भ्रष्टाचार आणि काळा पैसा संपवायच्या सगळ्या पाऊलांना जनतेनी प्रतिसाद दिला. त्याबद्दल मोदींनी जनतेच वंदन केलं. तसंच आजचा दिवस हा काळा पैसा विरोधी दिवस आहे. १२५ कोटी भारतीय यानंतर काळा पैसा विरोधी लढाई लढले आणि जिंकले असंही पंतप्रधानांचं म्हणणं आहे.

भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाचा नायनाट करण्यासाठी सरकारनं अनेक पाऊलं उचलली. भारताच्या जनतेनं त्याला सातत्यानं प्रतिसाद दिला. यासाठी मी त्यांच्यासमोर नतमस्तक आहे. १२५ कोटी भारतीयांनी निर्णायक लढाई लढली आणि जिंकली.

- Advertisement -

गेल्या वर्षी रात्री ८ च्या सुमाराला पंतप्रधान मोदींनी नोटबंदीची घोषणा केली होती. तशीच काहीशी घोषणा ते काळ्या पैशाविरोधातल्या लढ्याबाबत करतील का, अशी चर्चा सुरू झालीय. राजकीय वर्तुळातही चर्चांना ऊत आलाय. यात तथ्य किती ते कुणालाच ठाऊक नाहीये, कारण मोदींची कार्यशैली बघता, ते अशा निर्णयांबाबत ताकास सूर लागू देत नाहीत. पण गुजरात निवडणुका तोंडावर आहेत, आणि २०१९ ही फार लांब नाहीये. त्यामुळे मोदींनी अशी कोणती घोषणा केली तर आश्चर्य वाटायला नको.

- Advertisement -