Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeदेश'अनंतकुमार हेगडेंची जीभ कापून आणणाऱ्यास १ कोटीचे बक्षीस'

‘अनंतकुमार हेगडेंची जीभ कापून आणणाऱ्यास १ कोटीचे बक्षीस’

बंगळुरू – केंद्रीय मंत्री व भाजप नेते अनंतकुमार हेगडे यांनी मंगळवारी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. संविधानात बदल करण्यासाठीच आम्ही सत्तेवर आलो आहोत, असे हेगडे यांनी म्हटले होते. त्यावर हेगडेंची जीभ कापून आणणाऱ्यास आम्ही १ कोटींचे बक्षीस देऊ, अशी घोषणा एमआयएमचे नेते गुरुशांत पट्टेदार यांनी केली आहे. गुरुशांत पट्टेदार हे कलबुर्गी जिल्ह्याचे माजी पंचायत सदस्य आहेत.

धर्मनिरपेक्ष म्हणून मिरवणाऱ्यांना स्वतःचे मूळ माहिती नाही. संविधानानेच त्यांना धर्मनिरपेक्ष म्हणवण्याचा अधिकार बहाल केला आहे. पण, याच संविधानात वारंवार बदल करण्यात आले आहेत आणि आता आम्हीही असे बदल करू, हे त्यांनी लक्षात ठेवावे. संविधानात बदल करण्यासाठीच आम्ही सत्तेवर आलो आहोत, असे वादग्रस्त वक्तव्य हेगडे यांनी केले होते. कोप्पल जिल्ह्यातील कुकानूर शहरात ब्राह्मण युवा परिषदेने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. त्यावर आता एमआयएमचे नेते गुरुशांत पट्टेदार यांनीही वादग्रस्त प्रतिक्रिया दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments