Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeदेशगुजरातमध्ये भाजपा काठावर पास! हिमाचलमध्ये फूल पास!!

गुजरातमध्ये भाजपा काठावर पास! हिमाचलमध्ये फूल पास!!

नवी दिल्ली: गुजरातमध्ये भाजपा १०० जागा पटकावून काठावर पास झाले. तर हिमाचल प्रदेशमध्ये ४४ जागा पटाकवून स्पष्ट बहुमत मिळवून फूलपास झाले. तब्बल सहाव्यांदा गुजरातमध्ये भाजप सत्तेवर आली. तर, हिमाचल प्रदेशमध्येही भाजपने सत्ताधारी काँग्रेसचा पराभव करत विजय मिळविला आहे.

गुजरातमध्ये सत्ताधारी भाजप विजयी षट्‌कार ठोकणार, की मागील दोन दशकांपासून विरोधी बाकांवर बसलेला काँग्रेस पक्ष सत्ताधारी होणार, हे आज स्पष्ट झाले. भाजपने विजयाचा षटकार मारला आहे. हिमाचल प्रदेशचा मागील २४ वर्षांचा राजकीय इतिहास पाहता येथे काँग्रेस आणि भाजप आलटून पालटून सत्ताधीश झाल्याचे दिसते.

हिमाचल प्रदेशात यंदा ७५.२८ टक्के एवढ्या रेकॉर्डब्रेक मतदानाची नोंद झाल्याने राजकीय विश्‍लेषकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मतदानोत्तर चाचण्यांचा कल येथेही भाजपच्या दिशेने आहे. निवडणूक प्रचारात भाजपने येथे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून काँग्रेसला लक्ष्य केले होते, तर काँग्रेसने वस्तू व सेवा कर (जीएसटी) आणि नोटाबंदीवरून सरकारवर निशाणा साधला होता.

पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांच्या वादळी सभांमुळे गुजरातमधील राजकारण चांगलेच तापले. उभय नेत्यांनी परस्परांवर केलेले आरोप- प्रत्यारोप राष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय ठरले. पाटीदार नेता हार्दिक पटेल, ‘ओबीसीं’चे नेतृत्व अल्पेश ठाकोर आणि दलित चेहरा जिग्नेश मेवानी हे तरुणतुर्क भाजपविरोधात एकत्र आल्याने येथील चुरस आणखीनच वाढली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments