Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeदेशपाटणा-मोकामा पॅसेंजरचे ६ डबे जळून खाक!

पाटणा-मोकामा पॅसेंजरचे ६ डबे जळून खाक!

ANI

महत्वाचे…
१.दुर्घटनेच्या वेळी संपूर्ण पॅसेंजर खाली असल्याने सुदैवाने मोठी जीवितहानी टळली २. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुविधा उपलब्ध नसल्याने विलंब ३. रेल्वेचे २ इंजिन देखील जळून खाक


पाटणा – पाटणा-मोकामा पॅसेंजरला मंगळवारी रात्री उशिरा अचानक आग लागली. या आगीत पॅसेंजरचे ६ डब्बे जळून खाक झाले आहेत. सुदैवाने घटनेच्या वेळी ही संपूर्ण पॅसेंजर रिकामी होती. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या प्रकरणाची चौकशीची मागणी पुढे येत आहेत.

रेल्वेच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोकामा-पाटणा फास्ट पॅसेंजर ही रेल्वे शंटिंग लाईनमध्ये उभी होती. मंगळवारी रात्री उशिरा रेल्वेच्या मधल्या डब्यात अचानक आग लागली. या आगिची तीव्रता इतकी होती की, रेल्वेचे ६ डब्बे यात जळून खाक झाले. इतर काही डब्यांचे देखील नुकसान झाले आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे स्थानिक रेल्वे प्रशासनात एक गोंधळ उडाला. तसेच, घटनेच्या वेळी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारची सुविधा तेथे उपलब्ध नव्हती. त्यामुळे आग आटोक्यात आणण्यास आणखी विलंब झाला. यात रेल्वेचे २ इंजिन देखील जळून खाक झाले आहेत.
या दुर्घटनेच्या वेळी संपूर्ण पॅसेंजर खाली असल्याने सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे. ही पॅसेंजर रोज सकाळी ०५.३५ वाजता मोकामाहून पाटणासाठी रवाना होते. या घटनेला रेल्वेप्रशासनाने आणि सरकारने गांभीर्याने घेण्याची मागणी होत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments