Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeदेशभाजपचे ज्येष्ठ नेतेच ‘अंतर्गत लोकशाही’चे बळी: काँग्रेसचा टोला

भाजपचे ज्येष्ठ नेतेच ‘अंतर्गत लोकशाही’चे बळी: काँग्रेसचा टोला

महत्वाचे…
१.अडवाणी, मुरली मनोहर जोशी, संजय जोशी भाजपच्या अंतर्गत लोकशाहीचे बळी
२.जर तुमच्या घरातच लोकशाही नाही तर देशात याचं कसं पालन केलं जाईल, असा सवाल केला ३. भाजपच्या या कृतीचा काँग्रेसनेही घेतला समाचार


नवी दिल्ली: अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून काँग्रेस व राहुल गांधींवर टीका करण्याची एकही संधी भाजप सोडताना दिसत नाही. भाजपच्या या कृतीचा काँग्रेसनेही समाचार घेतला असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी भाजपच्या पक्षांतर्गत लोकशाहीचा मुद्या समोर आणत मोदी हे आपल्याच पक्षातील नेत्यांच्या प्रश्नांना कधी उत्तर देणार, असा सवाल उपस्थित केला आहे. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, संजय जोशी, केशुभाई पटेल आणि आनंदीबेन पटेल यांसारख्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचे नाव घेत हे सर्व मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या अंतर्गत लोकशाहीचे बळी ठरल्याचा टोला लगावला.

सुरजेवाला यांनी ट्विट करत म्हटले की, पंतप्रधानजी शहजाद, शाह-जादा आणि शौर्य यांच्याप्रती आपले उफाळून आलेलं प्रेम सर्वचजण जाणतात. पण देशाला यापेक्षा तुम्ही भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी शौरी, सिन्हा (यशवंत),सिन्हा (शत्रुघ्न) यांनी विचारलेल्या प्रश्नांना कधी उत्तर देणार? आणि मोदीजी तुम्ही आणि शहा यांच्या अंतर्गत लोकशाहीचे बळी ठरलेले लालकृष्ण अडवाणी, केशुभाई पटेल, हरेन पंड्या, आनंदीबेन पटेल, मुरली मनोहर जोशी, संजय जोशी यांच्याबाबतही देशाला उत्तर द्या, गुजरात आणि देशाला काहीतरी सांगा. का, या सर्वांना इतिहासाच्या पुस्तकात बंद करण्यात आलं, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

सुरजेवाला यांच्या ट्विटनंतर सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यास सुरूवात झाली. दरम्यान, मोदी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची खिल्ली उडवत काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीत गडबड असल्याचे म्हटले. जर तुमच्या घरातच लोकशाही नाही तर देशात याचं कसं पालन केलं जाईल, असा सवालही उपस्थित केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments