Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeदेशश्रीदेवी यांची हत्या तर नाही ना?- सुब्रमण्यम स्वामी

श्रीदेवी यांची हत्या तर नाही ना?- सुब्रमण्यम स्वामी

नवी दिल्ली: भाजप नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूविषयी एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. दुबईमध्ये लग्नसोहळ्यासाठी गेलेल्या अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अकाली मृत्यूमुळे आता अनेक तर्कवितर्क लावले जात असून स्वामी यांनी त्यांची हत्या तर नाही ना अशी शंका व्यक्त केली आहे. मद्यपानाचे सेवन करत नसतानाही श्रीदेवी यांच्या शरीरात मद्याचे अंश आढळल्यामुळे अनेक प्रश्नांनी डोके वर काढले आहे, असे ते म्हणाले.

बाथटबमध्ये पडून श्रीदेवी यांचा मृत्यू झालाच कसा हा मुद्दा स्वामी यांनी उचलून धरल्याचे एएनआयने प्रसिद्ध केले आहे. कोणी धक्का दिल्याशिवाय त्या बाथटबमध्ये पडल्याच कशा, असा प्रश्न उपस्थित करत त्यांच्या मृत्यूच्या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्यात यावी अशी मागणी स्वामी यांनी केली. त्याशिवाय हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजचं काय झालं, असे म्हणत स्वामी यांनी डॉक्टरांच्या अहवालावरही प्रश्न उपस्थित केला आहे.

स्वामी यांच्यापूर्वी अमर सिंह यांनीही श्रीदेवी या हार्ड ड्रिंकर नव्हत्या असे वक्तव्य केले होते. श्रीदेवी यांचा मृत्यू झाल्याची बातमी आपल्याला त्यांचे बती बोनी कपूर यांच्याकडूनच समजल्याचंही सिंह यांनी स्पष्ट केलं. त्यासोबतच श्रीदेवी यांनी आत्तापर्यंत व्हिस्की, ब्रँडी, टकिला अशा प्रकारच्या हार्ड ड्रिंक्सना हातही लावल्याचे मी पाहिलेले नाही. लग्न समारंभात सहसा वाईन प्यायली जाते. वाईन मध्ये अल्कोहलचे प्रमाण नाममात्र असते. मात्र समारंभात जर वाईन जास्त प्यायली गेली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे श्रीदेवी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीरात अल्कोहलचे प्रमाण आढळले असेल असेही सिंह यांनी म्हटले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments